मोहित सोमण: रेपो दरातील कापणीनंतर बँक निर्देशांकातील जबरदस्त वाढीमुळे शेअर बाजारात अखेरच्या सत्रात वाढ झाली आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात वाढ झाल्याने सेन्सेक्स ४३७.०५ व निफ्टी १५२.७० अंकाने वाढ झाली आहे. परिणामी सेन्सेक्स ८५७१२.३७ व निफ्टी २६१८६.४५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स बँक ५७१.५२ व बँक निफ्टी ४८८.५० अंकाने उसळला. आज आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दरात २५ बेसिस पूर्णांकाने कपात करण्याचा निर्णय घेतल्याने रेपो दर ५.२५% पातळीवर स्थिरावला आहे. त्यामुळेच बँकेच्या कर्जाचे व्याजदर कमी होण्याची शाश्वती निर्माण झाल्याने बँक, एनबीएफसी कंपनीच्या शेअर्ससह रियल इस्टेट,ऑटो जिथे रोख प्रवाह महत्वाचा ठरतो या ठिकाणी शेअर्समध्ये वाढ झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकातील अखेरच्या सत्रात स्मॉलकॅप १०० (०.५७%), स्मॉलकॅप ५० (०.५३%) निर्देशांकात घसरण झाली असली तरी इतर निर्देशांकात वाढ झाली ज्यात सर्वाधिक वाढ निफ्टी १०० (०.५३%), मिडकॅप १०० (०.४९%), निफ्टी २०० (०.५२%) निर्देशांकात वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ बँक (०.८२%),फायनांशियल सर्विसेस (०.९८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.४८%) व्यतिरिक्त पीएसयु बँक (१.५१%), प्रायव्हेट बँक (०.४९%),आयटी (०.९०%), मेटल (०.६७%),ऑटो (०.७४%), रिअल्टी (०.३४%) या शेअर्समध्ये वाढ कायम राहिली आहे. सकाळी गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भावना बाळगल्याने घसरलेले आयटी, रिअल्टी, ऑटो, मेटल शेअर्समध्ये निकालानंतर मोठी वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात खासकरुन शेवटच्या सत्रात चढउतारात घसरण झाल्याने सेन्सेक्स ३०० ते ४०० अंकामध्ये परावर्तित होत होता तर निफ्टीतील तेजी कायम होती. दुसरीकडे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक वाढवल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बाजारातील भावनांना आधार मिळाला. अर्थात आज डॉलरच्या तुलनेत रूपयात घसरण झाली असली तरी लवकरच रिकवर होण्यास सुरुवात होऊ शकते. कमोडिटी बाजारातील अस्थिरता आजही कायम असल्याने सोन्याच्या दरात वाढ झाली. डॉलरच्या किंमती वाढत रूपयांची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरल्याने भारतीय सराफा बाजारातील सोने वाढले असून चांदीच्या मागणीत मात्र घसरण झाल्याने व फेड दरातील कपात अपेक्षित असल्याने चांदी आज स्वस्त झाली. याशिवाय मोठ्या प्रमाणात लार्जकॅप शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे गुंतवणूकदारांना त्यांचा फायदा अखेरच्या सत्रात झाला.
अखेरच्या सत्रात आशियाई बाजारातील बहुतांश निर्देशांकात वाढ झाली आहे. गिफ्ट निफ्टी (०.५४%) सह हेंगसेंग (०.५२%), कोसपी (१.७४%) शांघाई कंपोझिट (०.६९%) निर्देशांकात वाढ झाली आहे तर सर्वाधिक घसरण निकेयी २२५ (१.२७%), स्ट्रेट टाईम्स (०.०८%), जकार्ता कंपोझिट (०.०९%) निर्देशांकात घसरण झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही डाऊ जोन्स (०.०२%), एस अँड पी ५०० (०.११%), नासडाक (०.१३%) निर्देशांकात वाढ झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ एम अँड एम फिनसर्व्ह (५.९२%), आरसीएफ (४.८०%), पतांजली फूड (४.१३%), सुंदरम फायनान्स (३.८७%), सुंदरम फायनान्स (३.४२%), एसबीआय कार्ड (३.४२%), इंडस (३.४१%), पीटीसी इंडस्ट्रीज (३.३७%), श्रीराम फायनान्स (३.२३%), एल अँड टी फायनान्स (३.०५%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण कँमस सर्विसेस (८०.०४%), काईन्स टेक (१२.५५%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (५.०२%), डेटा पँटर्न (४.५१%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.३४%), बंधन बँक (४.१३%), सफायर फूडस (३.६९%), नेटवेब टेक्नॉलॉजी (३.६५%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'भारतीय बाजारपेठांनी आरबीआयच्या अनपेक्षित २५ बीपीएस दर कपातीला उत्साहाने प्रतिसाद दिला आहे, जी दुसऱ्या तिमाहीतील मजबूत जीडीपी डेटामुळे अशक्य वाटत होती. या आश्चर्याने, महागाईच्या तीव्र घटीच्या अंदाजांसह आणि सहाय्यक तरलता उपायांसह, समभागांमध्ये जोखीम-संवेदनशीलता निर्माण केली आहे. खर्चात घट झाल्यामुळे ऑटो, रिअल इस्टेट आणि एनबीएफसी सारख्या दर-संवेदनशील क्षेत्रांमध्ये वाढ होत आहे. खाजगी बँकांनाही ट्रेझरी नफ्याच्या अपेक्षेपेक्षा वाढ झाली आहे, तर निव्वळ व्याज मार्जिन (एनआयएम) बद्दलच्या चिंतेमुळे त्यांची वाढ मर्यादित झाली आहे. एकूणच, डिसेंबरमध्ये मजबूत कॉर्पोरेट कमाईवर लक्ष केंद्रित करून अल्पकालीन दृष्टीकोन सावधपणे सकारात्मक राहिला आहे. तथापि, वाढती चालू खात्यातील तूट आणि जागतिक व्यापार तणाव यासारख्या जवळच्या जोखमी आव्हाने निर्माण करत आहेत. महिन्यासाठी देशांतर्गत कल राखण्यासाठी यूएस फेडचा दर कपातीचा पवित्रा महत्त्वपूर्ण असेल.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांमध्ये आज अस्थिर पण उत्साही सत्र दिसून आले, कारण आरबीआयने २५-बीपीएस रेपो दर ५.२५% पर्यंत कमी केला. बेंचमार्क निफ्टी २५९९९.८० पातळीवर उघडला, काही काळासाठी २५९८५ पातळीवर घसरला आणि नंतर २६२०० पातळीच्या पातळीची चाचणी घेण्यासाठी तीक्ष्ण पुनरागमन केले. बँक निफ्टीनेही धोरणात्मक हालचालींना त्वरित प्रतिसाद दिला, दिवसाच्या ५९१०६.५५ पातळीच्या नीचांकी पातळीवरून ५९,७७७.३५ पातळीच्या उच्चांकावर पोहोचला. क्षेत्रीय हालचाली मिश्रित होत्या, ज्यामध्ये पीएसयू बँका, आयटी, वित्तीय सेवा आणि धातूंनी आघाडी घेतली, तर मीडिया, एफएमसीजी, ऊर्जा आणि फार्मा कमकुवत नोटवर बंद झाले. एफ अँड ओ सेगमेंटमध्ये, इंडिगो, केनेस, एम्बर, पॉवरइंडिया आणि युनोमिंडा मध्ये लक्षणीय ओपन इंटरेस्ट बिल्डअप दिसून आले, जे या काउंटरमध्ये वाढलेल्या डेरिव्हेटिव्हचे संकेत देते.'
आजच्या बाजारातील बँक निफ्टीतील परिस्थितीवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'शुक्रवारच्या सत्रात, बँक निफ्टीने एक दीर्घ तेजीची कॅंडलस्टिक तयार केली, त्याने त्याचा १० दिवसांचा एसएमए (Simple Moving Average SMA) यशस्वीरित्या परत मिळवला आणि चालू सकारात्मक गतीला बळकटी दिली. तथापि, आरएसआय (Relative Strength Index RSI) अद्याप तेजीच्या क्रॉसओवरमध्ये प्रवेश केलेला नाही, ज्यामुळे काही पुष्टीकरण अद्याप प्रलंबित आहे असे सूचित होते. एकंदरीत, तांत्रिक सेटअप दर्शवितो की बँक निफ्टी निर्देशांकात प्रचलित अपट्रेंड कायम आहे. वरच्या बाजूला, प्रतिकार (Resistance) ६०००० पातळीच्या जवळ आहे, तर तात्काळ समर्थन (Support) ५९२५० पातळीच्या आसपास ओळखले जाते, ज्यामुळे निर्देशांक एका परिभाषित ट्रेडिंग रेंजमध्ये चांगल्या स्थितीत राहतो.'
आजच्या बाजारातील रूपयावर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'डॉलर निर्देशांक स्थिर राहिल्याने रुपया ०.०८ पैशांनी किंचित कमकुवत होऊन ८९.९२ वर व्यवहार करत होता, परंतु सततच्या एफआयआय विक्रीमुळे चलनावर दबाव राहिला. आरबीआयच्या २५ बीपीएस दर कपातीमुळे वित्तीय क्षेत्रांना काही स्थिरता मिळू शकते, परंतु भारत-अमेरिका व्यापार करारातील विलंब आणि वाढत्या सोन्या-चांदीच्या आणि धातूच्या किमती भावनांवर परिणाम करत आहेत. रुपया ८९.७५-९०.२५ रूपयांच्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे.'
आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले आहेत की,' शुक्रवारी निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली, कारण त्याला चलनविषयक धोरणाचे निकाल मिळाले आहेत. ट्रेंड सकारात्मक राहिला आहे, निर्देशांक २१ ईएमए (Exponential Moving Average EMA) पातळीच्या वर टिकून आहे. तासिक चार्टवर निर्देशांकाने अलिकडच्या एकत्रीकरणातून ब्रेकआउट दिला आहे, जो वाढती आशावाद दर्शवितो. आरएसआय (RSI) ने पुन्हा एकदा तेजीचा क्रॉसओवर मिळवला आहे, जो मजबूत गतीकडे निर्देश करतो.अल्पावधीत, ट्रेंड मजबूत राहू शकतो, निफ्टी २६,३००/२६४४० पातळीच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे. २६०६०-२६००० पातळीवर आधार आहे. जोपर्यंत निर्देशांक २६००० पातळीच्या वर टिकत आहे तोपर्यंत घसरणीवर खरेदी करणे अनुकूल असू शकते.'
सोन्यातील टेक्निकल पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'कॉमेक्स सोन्याचा भाव ४२०० डॉलर्सच्या महत्त्वपूर्ण समर्थनाच्या वर स्थिरावल्याने आणि ४२२४ डॉलर्सच्या वर गेल्याने सोन्याचा भाव ५२५ रुपयांनी वाढून १३०६५० रुपयांवर सकारात्मक व्यवहार झाला. आज नंतर यूएस कोअर पीसीई किंमत निर्देशांक रांगेत असल्याने, फेडरल रिझर्व्हकडून १० डिसेंबर रोजी दर कपातीच्या अपेक्षेनुसार सहभागींनी त्यांची तेजीची स्थिती कायम ठेवली आहे. सोन्याला ४,१८० डॉलर्सवर मजबूत समर्थन मिळत आहे, तर प्रतिकार ४२५५ $ च्या जवळ आहे. एमसीएक्समध्ये समर्थन १२८००० रुपये आणि प्रतिकार १३१५०० रुपयांच्या जवळ दिसत आहे.'






