Friday, December 26, 2025

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक
मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शनिवारी ते रविवारी सकाळी ००:३० ते दुपारी ४:३० पर्यंत गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर चार तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्लॉक कालावधीत गोरेगाव आणि सांताक्रूझ स्थानकांदरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर धावतील. रविवारी पश्चिम रेल्वे उपनगरीय विभागात दिवसा ब्लॉक राहणार नाही. महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– कल्याण मुख्य मार्ग तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस– पनवेल हार्बर मार्गासह ट्रान्स-हार्बर व पोर्ट मार्गावर मध्य रेल्वेचा साप्ताहिक मेगा ब्लॉक घेण्यात येणार नाही. सर्व मार्गांवरील नियमित उपनगरी सेवा रविवारी लागू असलेल्या वेळापत्रकानुसारच चालू राहतील.
Comments
Add Comment