Friday, December 5, 2025

दिल्ली पॅरिस भाडे २५०००, तर दिल्ली कलकत्ता तिकिट ८५०००रूपये, प्रवाशांची इंडिगो एअरलाइन्सकडून आदेशांचे उल्लंघन करत लूटमार सुरू?

दिल्ली पॅरिस भाडे २५०००, तर दिल्ली कलकत्ता तिकिट ८५०००रूपये, प्रवाशांची इंडिगो एअरलाइन्सकडून आदेशांचे उल्लंघन करत लूटमार सुरू?

मोहित सोमण: इंडिगो विमाने शेकडोंच्या संख्येने रद्द झाल्याने उपलब्ध असलेल्या विमानाचे तिकिट अव्वाच्या सव्वा दराने सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूटमार सुरू असल्याने प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. एका तिकिटाचे दर ३००० ते ४००० पासून ६०००० रूपयांपर्यंत गगनाला भिडले आहेत. काल आणि परवा १९१ पेक्षा अधिक विमाने इंडिगो (IndiGo) एयरलाईनने रद्द केल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय झाली आहे. सर्वात मुख्य बाब म्हणजे सरकारच्या हवाई उड्डाण विभागाच्या डीजीसीएने स्पष्टपणे तिकीट न वाढवण्याची ताकीद दिल्यानंतरही कंपनीच्या मोबाईल अँप किंवा पोर्टलवर अथवा इतर थर्ड पार्टी अँपवरली तिकिट दर महागड्या दरात विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित प्रवाशांनी ही तक्रार करताना प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीने तिकिटाचे दर ६०००० रुपयांवर वाढवले आहेत.'

एअरलाइन्सने लवकरात लवकर कायद्याचे पालन करूनच व्यवस्था पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. यापूर्वीच सरकारने अधिसूचनेत सांगितलेल्या नियामांचे पालन करताना व्यवस्था सुनिश्चित राहिल याची खात्री करण्यासाठी सांगितले होते. मात्र तांत्रिक कारणांमुळे, कमी मनुष्यबळामुळे व बदलेल्या पायलट नियमांची पूर्तता करताना पायलटांचेही मनुष्यबळ कमी पडल्याने अनेक विमाने आजही रद्द झाल्याचा खुलासा प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परतावा (Refund) घेण्यासाठी लांब रांगा लागल्याचे चित्रही प्रसारमाध्यमांनी दाखवले आहे.

डीजीसीए (Directorate of Civil Aviation DGCA) या नियामक आयोगाने मोठ्या प्रमाणात यासाठी इंडिगो कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची चौकशी सुरू केली असून व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. काल संध्याकाळी कंपनीने पुढील ४८ तासात व्यवस्था पूर्ववत होईल असे म्हटले होते. इंडस्ट्रीतील सुत्रांच्या माहितीनुसार, इंडिगोची गेल्या १ महिन्यात ६२% विमाने रद्द करण्यात आली होती ज्यामुळे मोठा फटका प्रवाशांना बसला. तरीही व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी अद्याप यंत्रणेला यश न आल्याने या निमित्ताने कंपनीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कालही उपलब्ध विमानाचे तिकिट दर ४३००० रूपयांवर पोहोचले होते.

याउलट, अनेक परदेशी शहरांना जाणाऱ्या विमानांचा खर्च अनेक व्यस्त देशांतर्गत मार्गांपेक्षा कमी झाला आहे कारण या संकटात आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही. जगातील सर्वात व्यस्त मार्गांपैकी एक असलेल्या दिल्ली आणि मुंबई दरम्यान परतीच्या विमानांचा खर्च आता इकॉनॉमी श्रेणीत सुमारे ६०००० रुपये सुरू असल्याचे रिपोर्टिंग प्रसारमाध्यमांनी केले आहे.

इंडिगोने दिल्ली विमानतळावरून मध्यरात्रीपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केली आहेत जी आजपर्यंतच्या एकूण ५२३ रद्द झालेल्या विमानांपैकी केवळ एक भाग आहे. कोणताही पर्याय नसल्यामुळे, प्रवाशांना दुसऱ्या एअरलाइनसह शेवटच्या क्षणी बुकिंग करायचे असल्यास अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहेत दिल्ली- कोलकातासाठी आज उपलब्ध असलेल्या विमानाची किंमत सुमारे ३२००० रुपये आहे. उद्याच्या फेरीसाठी, त्याच मार्गावर ८५००० रुपये आहेत ज्यामुळे ते युरोपला जाण्यापेक्षा महाग झाले आहे. माहितीनुसार, सर्वात स्वस्त दिल्ली-लंडन विमान प्रवासाचे भाडे २५००० रुपयांच्या आसपास आहे, तर दिल्ली-पॅरिसचे भाडे २५००० रुपयांपेक्षा कमी आहे. दोन्ही ठिकाणांसाठी राउंड-ट्रिपचा खर्च ६०००० रुपयांपेक्षा कमी आहे.

मुंबई आणि चेन्नई दरम्यानचा सर्वात स्वस्त विमान प्रवासाचा भाडा सुमारे ६०००० रुपयांचा आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-श्रीनगर विमानाचे तिकीट ज्याची किंमत इतर दिवशी १०००० रुपयांपेक्षा जास्त नाही त्या किमान ६२००० रुपयांना विकल्या जात आहेत. आणि ती फक्त एक मार्ग आहे. दुसऱ्या दिवसासाठी बुक केलेले परतीचे तिकीट ९२००० रुपयांपेक्षा जास्त आहे. यामुळे तिकिट न वाढवण्याचा सूचना दिल्या असतानाही आदेशाचे उल्लंघन करून सरास प्रवाशांची लूट सुरू असल्याचे प्रवासी सांगत आहेत.

नवीन फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन (FDTL) नियमांमुळे कर्मचाऱ्यांसाठी जास्त विश्रांती कालावधी अनिवार्य करणाऱ्या वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे इंडिगोला शेकडो उड्डाणे रद्द करावी लागली अशी प्राथमिक माहिती मिळाली होती. इंडिगोने कबूल केले आहे की नवीन FDTL नियमांनुसार आवश्यक असलेल्या वैमानिकांची संख्या त्यांनी चुकीची ठरवली ज्यामुळे हे संकट निर्माण झाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >