मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा आणि पारदर्शक बदल केला आहे. आतापर्यंत तात्काळ तिकीटचा ओटीपी आधारित नियम केवळ ऑनलाइन तिकीटांसाठी लागू होता. मात्र आतापासून आरक्षण खिडकीवर सुद्धा तात्काळ तिकिटांसाठी ओटीपी नियम लागू होणार आहे. यामुळे तात्काळ तिकीट प्रणाली अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे प्रशासनाने केलेल्या या नियमामुळे, आता कोणताही प्रवासी खिडकीवरून तात्काळ तिकीट बुक करेल तेव्हा, तिकीट फॉर्ममध्ये दिलेल्या त्याच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. यामुळे तिकीट निश्चित होण्यासाठी, प्रवाशाला खिडकीवर हा योग्य ओटीपी सांगाणे अनिवार्य राहणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या महत्त्वाच्या पावलामुळे गरजू प्रवाशांना तिकीट मिळणे अधिक सोपे होईल आणि गैरप्रकारांना आळा बसेल.
पानीपत: हरियाणातून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.या प्रकरणात एका महिलेने केलेली कृती ऐकताच जगात किती प्रमाणात क्रुरता वाढली आहे याची जाणीव होते. ...
रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन व्यवस्थेची चाचणी १७ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू करण्यात आली होती. सध्या ही प्रणाली ५२ ट्रेन्समध्ये लागू झाली असून आता ती पूर्णपणे लागू करण्याची तयारी रेल्वेने केली आहे. अशाप्रकारे तात्काळ तिकीट प्रणालीमध्ये रेल्वेने एका रात्रीत हा बदल केलेला नसून हे नियम अनेक टप्प्यांमध्ये लागू करण्यात आले आहेत.
जुलै २०२५ मध्ये ऑनलाइन तात्काळ तिकिटांसाठी आधार आधारित पडताळणी सुरू करण्यात आली होती. तर ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑनलाइन सामान्य तिकिटांसाठी पहिल्या दिवशीच्या बुकिंगवर ओटीपी प्रणाली लागू करण्यात आली होती. यानंतर २८ ऑक्टोबर २०२५ पासून आयआरसीटीसीच्या माध्यमातून सकाळी ८ ते १० या वेळेत तिकीटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले. आयआरसीटीसीनुसार, तिकीटांची मागणी सर्वाधिक असते त्याच वेळेत म्हणजे सकाळी ८ ते १० या वेळेत हा नियम लागू राहील. याचा अर्थ सकाळीच्या वेळेत आधार पडताळणी झालेले वापरकर्ते तिकीट खरेदी करू शकतील.





