अंबरनाथ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची मानली जाणारी अंबरनाथ नगरपरिषद निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाल्याचं स्पष्ट होत आहे, तर भाजपाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातंय.
फक्त नगराध्यक्ष आणि ९ वॉर्डांसाठीच लागू सुधारित कार्यक्रम
नवीन निवडणूक कार्यक्रमानुसार फक्त नगराध्यक्ष पद आणि ९ वॉर्डांसाठीच सुधारित कार्यक्रम लागू राहणार आहे.नव्या अर्जांना परवानगी नसेल. फक्त मंजूर अर्जवाल्यांनाच अर्ज मागे घेण्याची मुभा दिली आहे. यामुळे आधीच घेतलेले निर्णय कायम राहणार आहेत.
भाजपाच्या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध – मिळणार नाही पुनर्जीवन
छाननीत भाजपाच्या ५ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले होते. निवडणूक स्थगित झाल्यानंतर नव्याने अर्ज भरण्याची परवानगी मिळेल अशी BJP मध्ये चर्चा होती, ज्यामुळे ५ पैकी २ उमेदवारांना संधी मिळू शकते अशी अपेक्षा होती. मात्र सुधारित कार्यक्रमाने हा मार्ग बंद झाला आहे. ज्यांचे अर्ज बाद आहेत ते बादच राहणार – हे स्पष्ट झाले आहे.
६ ब आणि ७ अ वॉर्डांचे अर्जही बादच
६ ब आणि ७ अ या वॉर्डांच्या निवडणुका आधी नव्याने जाहीर झाल्या होत्या.या दोन्ही वॉर्डांतील BJP उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले गेले होते.आताच्या निर्णयामुळे हे अर्ज पुनर्जीवित होणार नाहीत आणि नव्याने अर्जही दाखल करता येणार नाहीत.
भाजपाला मोठा धक्का – शिवसेना फायद्यात
निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.उलट, भाजपाच्या अनेक वॉर्डांमध्ये उमेदवार नसण्याची परिस्थिती कायम राहणार आहे, ज्यामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचं म्हटलं जात आहे.
मतदानाची तारीख जाहीर
न्यायालयाचा निकाल उशिरा आल्याने २ डिसेंबरची निवडणूक स्थगित करण्यात आली होती.
आता नवीन वेळापत्रक पुढीलप्रमाणे
मतदान : २० डिसेंबर २०२५ मतमोजणी : २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून
सुधारित कार्यक्रमानुसार —
२४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांसाठी तसेच ७६ नगरपरिषद व नगरपंचायतीमधील १५४ सदस्यपदांसाठी निवडणूक कार्यक्रम राबवला जाईल.






