करंजी : करंजीजवळ महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटी बसला झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आणि दहा जण गंभीर जखमी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगांव तालुक्यातील जळका फाट्याजवळ रात्री हा अपघात झाला. जखमींना पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चंद्रपूर-यवतमाळ एसटीला करंजीकडून वणीकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. अपघातात एसटीचा ड्रायव्हरच्या बाजूचा भाग हा पूर्णपणे कापला गेला. ड्रायव्हरची केबिन तर जागेवरच नव्हती. यावेळी खिडकीजवळ बसलेल्या दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी पोलिसांच्या सहकार्याने मदतकार्य केले आणि सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले.