‘हॅपी पटेल’चा धमाकेदार खुलासा! वीर दास आणि मोना सिंगची गुप्तहेर कथा १६ जानेवारी २०२६ रोजी रिलीज
आमिर खानचा नवीन धमाकेदार गुप्तहेर चित्रपट हॅपी पटेल ची घोषणा अखेर करण्यात आली आहे. हा चित्रपट वीर दासच्या दिग्दर्शकीय पदार्पणाचा महत्त्वाचा टप्पा ठरतो. ज्यात वीर दास आणि मोना सिंग मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. शीर्षक जितकं मजेदार आहे, तसंच मेकर्सनी रिलीज केलेलं अनाउन्समेंट व्हिडिओही मजेदार आहे. ज्यात आमिर खान आणि वीर दास दिसतात. आमिर खान प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली तयार होत असलेला दिग्दर्शक वीर दासचा 'हॅपी पटेल' हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
हॅपी पटेल ची घोषणा अगदी हटके आणि मजेशीर पद्धतीने करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये आमिर खान, वीर दासला विचारताना दिसतात की तो आपल्या फिल्ममध्ये अॅक्शन, रोमांस आणि अगदी आयटम नंबरही कशा अंदाजात दाखवणार आहे. आमिरला सतत याची चिंता वाटताना दाखवलं आहे की प्रेक्षक याला कसा प्रतिसाद देतील; तर दुसऱ्या बाजूला व्हिडिओतील इतर लोक चित्रपटाची प्रशंसा करताना दिसतात. त्यांच्या संभाषणातील हा मजेशीर विरोधाभास संपूर्ण अनाउन्समेंटला अधिक मनोरंजक बनवतो. इतकं नक्की की एकदम वेगळ्या प्रकारचा सिनेमा येतो आहे.
View this post on Instagram
सर्वात खास म्हणजे, आमिर खान प्रोडक्शन्स नेहमीच हटके आणि अनोख्या कथा अत्यंत सर्जनशीलतेने सादर करत आलं आहे. लगान, तारे जमीन पर, दंगल आणि सीक्रेट सुपरस्टार सारख्या अविस्मरणीय चित्रपटांनंतर, ही फिल्मही वेगळ्या सिनेमाचा अनुभव देण्याचा आणखी एक प्रयत्न आहे. यावेळी ते प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन वीर दाससोबत काम करत आहेत—ज्यांनी केवळ जगभरात आपली कॉमेडी स्पेशल्स सादर केली नाहीत, तर गो गोवा गॉन, बदमाश कंपनी आणि दिल्ली बेली सारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. हॅपी पटेल हा वीर दासचा दिल्ली बेली नंतर आमिर खान प्रोडक्शन्ससोबतचा दुसरा कोलॅबोरेशन आहे.






