Wednesday, December 3, 2025

राज्यात २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झाले मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर

राज्यात २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झाले मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? जाणून घ्या सविस्तर

राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी काल (२ डिसेंबर) मतदान पार पडले. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या २६४ अध्यक्षपदांच्या आणि ६ हजार ४२ सदस् यपदांच्या जागांसाठी मतदारांचा कौल मतपेटीत कैद झाला आहे. दरम्यान, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आज (३ डिसेंबर) होणारी मतमोजणी लांबणीवर पडली आहे. दरम्यान राज्यभरात कुठल्या जिल्ह्यात किती टक्के मतदान झाले, याची आकडेवारी जाणून घेऊया सविस्तर:

पुणे

पुणे जिल्ह्यात १२ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायती आहेत. जिल्ह्यातील मंचर, माळेगाव, जेजुरी, वडगाव, सासवड, दौंड, इंदापूर, जुन्नर, तळेगाव दाभाडे, भोर, चाकण, आळंदी, राजगुरूनगर, लोणावळा, शिरूर या सर्व जागांसाठी अंदाजे ६८.०१% एवढे मतदान झाले आहे. प्रशासनाकडून अंतिम आकडेवारी जाहीर झाली नसल्यामुळे अंदाजे आकडेवारी सांगण्यात आली आहे.

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूर, मुरगूड, मलकापूर, वडगाव, गडहिंग्लज, कागल, पन्हाळा, कुरुंदवाड, हुपरी, शिरोळ या नगरपरिषदेसाठी तर आजरा, चंदगड, हातकणंगले या नगरपंचायतीसाठी असे एकूण ७८.८७% मतदान झाले. ज्यात जिल्ह्यातील मुरगुड नगरपालिकेसाठी सर्वाधिक ८८.४३% मतदान तर जयसिंगपूर नगरपंचायतीसाठी सर्वात कमी ७०.२०% मतदान झाले.

सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट, दूधनी, मैंदर्गी, बार्शी, मोहोळ, अकलूज, कुर्डुवाडी, पंढरपूर, करमाळा, सांगोला या नगरपालिकांसाठी एकूण ६७. १०% मतदान झाले.

जळगाव

जळगाव जिल्ह्यात जामनेर, भुसावळ, यावल, फैजपूर, पाचोरा, वरण गाव, अमळनेर, चाळीसगाव, सावदा, चोपडा, भडगाव, रावेर, धरणगाव, एरंडोल, पारोळा, नशिराबाद, मुक्ताईनगर, शेंदुर्णी या जागांवर नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी एकूण ६५.५६% मतदान झाले आहे.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण चार नगरपालिका आहेत. ज्यात मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कणकवली यांचा समावेश आहे. या चार नगरपालिकांसाठी एकूण ७४.३५% मतदान झाले आहे.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात एकूण ११ नगरपरिषदांसाठी ६८.३४% मतदान झाले आहे. ज्यात पिंपळगाव, मनमाड, भगूर, नांदगाव, सिन्नर, सटाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, ओझर, चांदवड, येवला या नगरपरिषदांचा समावेश आहे.

अमरावती

अमरावती जिल्ह्यातही एकूण ११ नगरपालिका आणि नगरपंचायती आहेत. ज्यात अचलपूर, वरुड, दर्यापूर, मोर्शी, चिखलदरा, शेंदूरजना घाट, चांदूर रेल्वे, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, धारणी, नांदगाव खंडेश्वर या नगरपंचायतींसाठी ६८.३८ टक्के मतदान झाले.

बुलढाणा

बुलढाण्यामध्ये चिखली, खामगाव, मलकापूर, मेहकर, शेगाव, सिंदखेड राजा, लोणार, नांदुरा, जळगाव जामोद या १० नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी एकूण ६९.४२% मतदान झाले.

यवतमाळ

जिल्ह्यातील आर्णी, घाटंजी, वणी, दिग्रस, उमरखेड, पुसद, दारव्हा, पांढरकवडा, नेर या नगरपरिषदा आणि ढाणकी या नगरपंचायतीसाठी ६७.८४% मतदान झाले.

अकोला

अकोला जिल्ह्यात एकूण ४ नगर परिषदा व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान झाले. ज्यात हिवरखेड, तेल्हारा, मूर्तिजापूर, अकोट या नगरपालिका आणि बार्शीटाकळी या नगरपंचायतीचा समावेश आहे.

गोंदिया

गोंदियामध्ये ६२.८०% एकूण मतदान झाले आहे. तिरोडा, गोरेगांव, सालेकसा या जागांसाठी मतदान झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >