रायपूरमध्ये होणार भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना

रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात केली. मात्र आता सर्वांचे लक्ष या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामान्यावर आहे. कारण हा सामना भारताच्या मालिका विजयासाठी निर्णायक ठरणारा आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.



मालिकेतील पहिल्या सामन्यात ३४९ धावांचा स्कोर केल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी पराभूत करत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या जोरदार शतकाने, रोहित शर्माच्या धडाकेबाज ५७ धावांनी आणि केएल राहुलच्या संयमी अर्धशतकाने भारतीय फलंदाजीला धार आली आहे. तर गोलंदाजीत कुलदीप यादवने निर्णायक विकेट घेत आफ्रिकन खेळाडूंची कंबर मोडली. मात्र भारतीय संघ आता दुसरी एकदिवसीय मालिका जिंकून २-० अशी आघाडी घेत आफ्रिकासोबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करताना दिसेल.




शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना अनिश्चित काळासाठी मैदान सोडावे लागले आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या खेळीमुळे भारतीय संघ अतिशय मजबूत दिसत आहे.


भारत संघ:
केएल राहुल (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, तिलक वर्मा, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड


दक्षिण आफ्रिका संघ:
टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू बेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, रुबेन हर्मन, केशव महाराज, टोनी डी झोरजी, स्वान रिकेल्टन, मार्को यान्सन, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, प्रेनेलन सब्रायन

Comments
Add Comment

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या