रायपूर: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा रांचीतील पहिला सामना जिंकून भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेची दमदार सुरुवात केली. मात्र आता सर्वांचे लक्ष या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामान्यावर आहे. कारण हा सामना भारताच्या मालिका विजयासाठी निर्णायक ठरणारा आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा सामना आज रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्यात ३४९ धावांचा स्कोर केल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेला १७ धावांनी पराभूत करत १-० अशी आघाडी घेतली आहे. विराट कोहलीच्या जोरदार शतकाने, रोहित शर्माच्या धडाकेबाज ५७ धावांनी आणि केएल राहुलच्या संयमी अर्धशतकाने भारतीय फलंदाजीला धार आली आहे. तर गोलंदाजीत कुलदीप यादवने निर्णायक विकेट घेत आफ्रिकन खेळाडूंची कंबर मोडली. मात्र भारतीय संघ आता दुसरी एकदिवसीय मालिका जिंकून २-० अशी आघाडी घेत आफ्रिकासोबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करताना दिसेल.
गुवाहाटी: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या गुवाहाटी झोनल युनिटने एका समन्वित कारवाईत म्यानमारमधून भारतात कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ...
शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना अनिश्चित काळासाठी मैदान सोडावे लागले आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. ऋषभ पंतच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या खेळीमुळे भारतीय संघ अतिशय मजबूत दिसत आहे.
भारत संघ: केएल राहुल (कर्णधार), विराट कोहली, रोहित शर्मा, यशस्वी जायसवाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, तिलक वर्मा, वाशिंगटन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड
दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू बेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, रुबेन हर्मन, केशव महाराज, टोनी डी झोरजी, स्वान रिकेल्टन, मार्को यान्सन, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, प्रेनेलन सब्रायन






