Student Threatened For Conversion : धर्मांतरासाठी विद्यार्थ्याला धमकी, तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून धर्मांतरासाठी त्याच्यावर दबाब आणल्याच्या आरोपावरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र नगर येथील गोल्डन मैदानाजवळून हा विद्यार्थी कराटे क्लासला पायी जात असता एका महिलेसह तिघा जणांनी त्याला अडवून, त्याचा धर्म कोणता आहे, अशी विचारणा केली आणि त्याच्या धर्माबद्दल अपशब्द काढले. त्यानंतर तिघांनी त्याला धर्मांतरण करण्यासाठी सुचवून त्यासाठी आमिषही दाखवले.



विद्यार्थ्याने त्यास नकार देत ही बाब कराटे क्लासच्या शिक्षकांना सांगितली. या वेळी तिघेही जण जवळपासच्या चाळींमध्ये फिरून इतरांनाही धर्म बदलण्याविषयी सांगत होते. ही बाब भाजपच्या बोरिवली पूर्व मंडळाच्या उपाध्यक्षा ॲड. सीमा शिंदे तसेच विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचच्या स्वयंसेवकांना समजताच त्यांनी त्या दोघांसह कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तसेच धर्मांतर करण्यासाठी धमकावल्याच्या आरोपावरून तिघाही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन आरोपी दहिसर येथे तर एक मालाड येथे राहणारे आहेत. कस्तुरबा मार्ग पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :