मुंबई : बोरीवली (पूर्व) येथे कराटेच्या क्लासला जात असलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याला भररस्त्यात थांबवून धर्मांतरासाठी त्याच्यावर दबाब आणल्याच्या आरोपावरून तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र नगर येथील गोल्डन मैदानाजवळून हा विद्यार्थी कराटे क्लासला पायी जात असता एका महिलेसह तिघा जणांनी त्याला अडवून, त्याचा धर्म कोणता आहे, अशी विचारणा केली आणि त्याच्या धर्माबद्दल अपशब्द काढले. त्यानंतर तिघांनी त्याला धर्मांतरण करण्यासाठी सुचवून त्यासाठी आमिषही दाखवले.
मुंबई : (३ डिसेंबर) शासकीय नियमावलीला फाटा देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करुन प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ' रॅपीडो (Rapido) उबेर (Uber) यासारख्या ॲप ...
विद्यार्थ्याने त्यास नकार देत ही बाब कराटे क्लासच्या शिक्षकांना सांगितली. या वेळी तिघेही जण जवळपासच्या चाळींमध्ये फिरून इतरांनाही धर्म बदलण्याविषयी सांगत होते. ही बाब भाजपच्या बोरिवली पूर्व मंडळाच्या उपाध्यक्षा ॲड. सीमा शिंदे तसेच विश्व हिंदू परिषद आणि हिंदू जागरण मंचच्या स्वयंसेवकांना समजताच त्यांनी त्या दोघांसह कस्तुरबा मार्ग पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तसेच धर्मांतर करण्यासाठी धमकावल्याच्या आरोपावरून तिघाही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन आरोपी दहिसर येथे तर एक मालाड येथे राहणारे आहेत. कस्तुरबा मार्ग पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





