मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण कायम आहे. प्रामुख्याने शेअर बाजारातील अस्थिरतेचे वलय आजही कायम राहिल्याने शेअर बाजार लाल रंगात सुरु आहे. परवा आरबीआयच्या रेपो दर निर्णयाकडे गुंतवणूकदारांची नजर केंद्रित झाल्याने बाजारात संदिग्धता कायम आहे. सेन्सेक्स २३१.५० व निफ्टी ९५ अंकांनी सुरूवातीला घसरलेला आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण कायम राहिली असून निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक घसरण पीएसयु बँक, एफएमसीजी, कंज्यूमर ड्युरेबल्स निर्देशांकात झाली असून सर्वाधिक वाढ आयटी, मिडस्मॉल आयटी टेलिकॉम निर्देशांकात झाली आहे. निफ्टी व्यापक निर्देशांकात सकाळच्या सत्रात मिडकॅप १५०, मिड स्मॉलकॅप ४०० निर्देशांकात झाली आहे.
काल युएस बाजारात अखेरच्या टप्प्यात अथवा सत्रात टेक शेअर्समध्ये वाढ झाल्याने तसेच क्रिप्टोकरन्सीत सुधारणा झाल्याने युएस बाजार रिकव्हर झाले आहे. परिणामी शेअर बाजारात आज घसरण काही प्रमाणात रोखलेली दिसते. आशियाई बाजारातील सुरूवातीच्या कलात संमिश्र प्रतिसाद मिळत आहेत.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ डोम्स इंडस्ट्रीज (५.७५%), न्यूलँड लॅब्स (४.०६%), वोडाफोन आयडिया (३.६५%), सोनाटा सॉफ्टवेअर (३.२४%), जीई व्हर्नोवा (२.८९%), बिर्लासॉफ्ट (२.३८%), इंटलेक्ट डिझाईन (२.३०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एजंल वन (४.६४%), इंडियन बँक (३.३३%),वोक्हार्ट (३.००%), हिन्दुस्तान युनिलिव्हर (२.५१%), पंजाब नॅशनल बँक (२.१९%), जेके सिमेंट (१.८४%), सनटिव्ही नेटवर्क (१.४५%), बालकृष्ण इंडस्ट्रीज (१.६६%), सिटी युनियन बँक (१.४६%) समभागात झाली आहे.
बाजार पूर्व परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार डॉ वी के विजयाकुमार म्हणाले आहेत की,'विक्रमी उच्चांकापासून निफ्टीमध्ये सुमारे ३०० अंकांनी झालेली सुधारणा ही बँक निफ्टीमधील सुधारणा आणि रुपयाच्या सततच्या घसरणीमुळे निर्माण झालेल्या चिंतांसारख्या तांत्रिक घटकांमुळे झालेली सुधारणा मानली जाऊ शकते. बँक निफ्टीमधील सुधारणा आणि परिणामी एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेच्या वजनात झालेली घट हे शुद्ध तांत्रिक घटक आहेत ज्यांचा या शेअर्सच्या मूलभूत गोष्टींशी काहीही संबंध नाही. अर्थव्यवस्थेतील सुधारित पत वाढ आणि या बँकिंग प्रमुखांच्या मजबूत मूलभूत गोष्टींमुळे, ते योग्य वेळी परत येतील. सध्या बाजारात मंदावलेल्या घसरणीला कारणीभूत ठरणारी खरी चिंता म्हणजे रुपयातील सततची घसरण आणि आरबीआय रुपयाला आधार देण्यासाठी हस्तक्षेप करत नसल्यामुळे आणखी घसरण होण्याची भीती. वाढत्या कॉर्पोरेट कमाई आणि जीडीपी वाढीमध्ये मजबूत पुनरुज्जीवन या मूलभूत गोष्टींमध्ये सुधारणा होत असूनही ही चिंता एफआयआयना विक्री करण्यास भाग पाडत आहे. भारत-अमेरिका व्यापार करार प्रत्यक्षात आल्यावर रुपयाचे अवमूल्यन थांबेल आणि उलटेही होईल. हे या महिन्यात होण्याची शक्यता आहे. तथापि, कराराचा भाग म्हणून भारतावर लादल्या जाणाऱ्या शुल्कांच्या तपशीलांवर बरेच काही अवलंबून असेल. या अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांसाठी आदर्श धोरण म्हणजे लार्ज आणि मिडकॅप सेगमेंटमधील उच्च दर्जाच्या वाढीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे. स्मॉलकॅप सेगमेंट म्हणून, ते अजूनही जास्त मूल्यांकित केले जात आहे आणि म्हणूनच ते टाळणे चांगले.'
आजच्या निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक रणनितीकार आनंद जेम्स म्हणाले आहेत की,'काल घसरण २६०६० पातळीपर्यंत वाढली परंतु अपेक्षेप्रमाणे तेजी पुन्हा येण्याची चिन्हे दिसत नव्हती. परिणामी, २५८६०/७०० स्टँड उघड झाले, २५३०० पातळीवर येण्याची भीती होती. दरम्यान, वरच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांना २६०८७-२६१११ पातळीवरून प्रतिकार होऊ शकतो आणि पुनर्प्राप्तीची पुष्टी करण्यासाठी २६२०० पातळीच्यावर वाढ आवश्यक असेल.'






