Wednesday, December 3, 2025

Stock Market Closing Bell: मजबूत फंडामेंटलची 'अनुभुती' अखेरीस रिबाऊंड पीएसयु बँकेत तुफान घसरण सेन्सेक्स ३१.४६ अंकांने व निफ्टी ४६.२० अंकांने घसरला

Stock Market Closing Bell: मजबूत फंडामेंटलची 'अनुभुती' अखेरीस रिबाऊंड पीएसयु बँकेत तुफान घसरण सेन्सेक्स ३१.४६ अंकांने व निफ्टी ४६.२० अंकांने घसरला

मोहित सोमण:आज पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजारातील मजबूत फंडामेंटलची अनुभुती आल्याचे अखेरच्या सत्रातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. सकाळच्या मोठ्या घसरणीनंतर बाजार सावरत रिबाऊंड झाल्याने मोठ्या प्रमाणात घसरणीत कपात झाली. सेन्सेक्स ३१.४६ अंकांने घसरत ८५१०६.८१ व निफ्टी ४६.२० अंकाने घसरत २५९८६ पातळीवर बंद झाला आहे. सकाळच्या सत्रातील घसरलेल्या बँक निफ्टीतील रिकव्हरी व आयटी,प्रायव्हेट बँक निर्देशांकातील वाढीमुळे शेअर बाजारात सपाट घसरणीवर बंद झाला आहे. मात्र पीएसयु बँकेच्या मोठ्या घसरणीचे आज बाजारात खऱ्या अर्थाने घसरण अधोरेखित झाली आहे. पीएसयु बँक ३.०७% इतक्या मोठ्या प्रमाणात कोसळल्याने बाजारात मोठी पडझड झाली. याशिवाय कंज्यूमर ड्युरेबल्स, तेल व गॅस, एफएमसीजी शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा फटका बाजारात बसला होता. निफ्टी व्यापक निर्देशांकात मिड कॅप ५० (०.९६%), मिडकॅप १०० (०.८९%) स्मॉलकॅप ५० (०.४४%), मिडस्मॉलकॅप ४०० (०.७३%) निर्देशांकातील घसरणही प्रभावी ठरली आहे.

अखेरच्या सत्रात आरबीआयच्या रेपो दरातील निर्णयाची प्रतीक्षा गुंतवणूकदार करत असल्याने अस्थिरता अद्याप कायम राहिली असून बँक निर्देशांकातील एफडीआय (Foreign Direct Investment FDI) बद्दल अद्याप विचार नसल्याचे सरकारने स्पष्ट केल्याने मोठी घसरण बाजारात झाली. कमोडिटी बाजारातील अस्थिरतेचा फटका बसल्याने आज पुन्हा एकदा सोने चांदी महागले आहे. रूपया आज निचांकी पातळीवर पोहोचल्याने बाजारात काही प्रमाणात सेल ऑफ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे मात्र नफा बुकिंगसाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक घरगुती गुंतवणूकदारांनी वाढवल्याने रोख गुंतवणूक काही प्रमाणात राखली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. काल युएस बाजारात मोठ्या प्रमाणात टेक शेअर्समध्ये वाढ झाल्याने व एकूणच क्रिप्टोग्राफीतील वाढीमुळे तेजी जाणवली होती. मात्र व्याजदर कपातीतील अस्थिरता, रशिया युक्रेन, रशिया युरोप वाद सुरूच असल्याचा फटका आशियाई बाजारातील बाजारात जाणवला. अर्थात संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी बहुतांश निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाली होती.

आज युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात तिन्ही बाजारात वाढ झाली आहे. तर आशियाई बाजारातील सर्वाधिक घसरण हेंगसेंग (१.३८%), शांघाई कंपोझिट (०.५१%), सेट कंपोझिट (०.२२%) बाजारात झाली असून सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (१.३९%), तैवान वेटेड (०.८२%) बाजारात झाली आहे.

आज अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ बिर्लासॉफ्ट (४.४०%), डोम्स इंडस्ट्रीज (४.२२%), वोडाफोन आयडिया (४.१५%), सोनाटा सॉफ्टवेअर (४.१०%), त्रिवेणी टर्बाइन (३.९८%), सफायर फूडस (३.८७%), न्यूलँड लॅब्स (३.७९%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण इंडियन बँक (५.४३%), वोक्हार्ट (५.३२%), ओला इलेक्ट्रिक (५.०२%), हुडको (५.५४%), टीआर आयएल (४.४७%), पंजाब नॅशनल बँक (४.४३%), हिताची एनर्जी (३.९८%), कॅनरा बँक (३.९१%), बँक ऑफ इंडिया (३.७३%), जीएमडीसी (३.६१%), सोलार इंडस्ट्रीज (३.५५%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,'एफआयआयच्या बाहेर जाण्यामुळे आणि चालू व्यापार अनिश्चिततेमुळे रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याने भारतीय शेअर बाजार मजबूत होत राहिले. नोव्हेंबरमध्ये औद्योगिक क्रियाकलाप मंदावले, उत्पादन पीएमआय मंदावलेल्या नवीन ऑर्डर, निर्यात मागणी कमी होणे आणि व्यापार तूट वाढण्याचे संकेत देत होता. जागतिक बाजारपेठेत संमिश्र वातावरण होते कारण गुंतवणूकदार फेड आणि ईसीबी चलनविषयक धोरण आणि चलनातील अस्थिरतेचे मूल्यांकन करत आहेत, तर बीओजे कडक होण्याच्या आणि सरकारी खर्चात वाढ होण्याच्या अपेक्षेमुळे जपानी बाँड उत्पन्नात वाढ झाल्यानंतर भावना सावध राहिल्या आहेत. या आठवड्यात आरबीआयचा धोरणात्मक निर्णय महत्त्वाचा असेल, विशेषतः बँकांसाठी, कारण मजबूत दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपी डेटानंतर दर कपातीची शक्यता कमी झाली आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >