Friday, December 26, 2025

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर; 'या' संकेतस्थळावर जाणून घ्या अधिक माहिती

पुणे: शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर सन २०२६ मधील नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परिक्षार्थ्यांना हे वेळापत्रक आयोगाच्या http://mpsc.gov.in व http://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर पाहाता येणार आहे. याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी माहिती दिली आहे.

प्रस्तावित वेळापत्रकानुसार सन २०२६ मध्ये राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५, महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२५, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा होणार आहेत.

या शिवाय महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा २०२६, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा २०२६ व महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त परीक्षा २०२६ इत्यादी परीक्षा होणार आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या या परिक्षांकरता अनेक दिवसांपासून परिक्षार्थी वेळपत्रक जाहीर होण्याची वाट पाहत असतात. वेळपत्रकानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करण्यास मदत होते. त्यामुळे वेळापत्रक जाहीर झाल्याने परिक्षार्थिंना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >