Wednesday, December 3, 2025

रूपयात आंतरराष्ट्रीय दबावामुळे लाजिरवाणी घसरण! प्रति डॉलर रूपया ९० रूपये पार

रूपयात आंतरराष्ट्रीय दबावामुळे लाजिरवाणी घसरण! प्रति डॉलर रूपया ९० रूपये पार

प्रतिनिधी: आज इतिहासात प्रथमच जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेचा फटका बसल्याने रूपयाने ९० रूपयांचा आकडा प्रति ग्रॅम डॉलर पार केला आहे. आज सुरूवातीच्या सत्रात रूपया ६ पैशाने घसरून ९०.१५ रूपये प्रति डॉलर या इंट्राडे निचांकी पातळीवर घसरला आहे. काल मोठ्या प्रमाणात रूपया घसरल्याने रूपया ८९.९० आसपास व्यवहार करत होता. जागतिक अस्थिरतेचा फटका संपूर्ण आठवड्यात बसल्याने रूपयात मोठ्या प्रमाणात चढउतार झाली आहे. याचाच परिपाक म्हणून रूपयावर दबाव वाढला. रूपयाप्रमाणे डॉलरमध्येही दबाव पातळी वाढली होती. मोठ्या प्रमाणात क्रिप्टोग्राफीत घसरण झाल्याने डॉलरवर दबाव पातळी वाढली परिणामी घसरण होत होती. डॉलरच्या तुलनेत रूपयांवर विक्रीचा दबाव वाढला परिणामी रूपयाही घसरला आहे.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, डॉलरच्या तुलनेत रुपया ८९.९६ वर उघडला आणि ९०.१५ रूपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला आणि नंतर ९०.०२ वर व्यवहार करण्यासाठी काही आधार मिळवला मात्र जो त्याच्या मागील बंदपेक्षा ६ पैशांनी कमी होता. मंगळवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ४३ पैशांनी घसरून ८९.९६ रूपयांच्या सर्वकालीन निचांकी पातळीवर स्थिरावला, याचे मुख्य कारण सट्टेबाजांकडून सतत होणारे शॉर्ट-कव्हरिंग आणि अमेरिकन चलनासाठी सततची आयातदार मागणी वाढल्याने रूपयांचे सेल ऑफ मोठ्या प्रमाणात वाढले होते.

रूपयांच्या भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष वरिष्ठ रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,' भारत-अमेरिका व्यापार कराराची पुष्टी न झाल्याने आणि वेळापत्रकात वारंवार होणाऱ्या विलंबामुळे रुपया पहिल्यांदाच ९० च्या खाली घसरला. बाजारपेठांना आता व्यापक आश्वासनांऐवजी ठोस आकडे हवे आहेत, ज्यामुळे गेल्या काही आठवड्यात रुपयाची विक्री वाढली आहे. धातू आणि सोन्याच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ झाल्याने भारताचे आयात बिल आणखी बिघडले आहे, तर अमेरिकेतील वाढत्या शुल्कामुळे निर्यात स्पर्धात्मकतेवर ताण येत आहे. यामुळे जागतिक बाजारपेठांच्या तुलनेत समभागांमध्ये आणि खनिज इंधन, यंत्रसामग्री, विद्युत उपकरणे आणि रत्ने यासारख्या आयात क्षेत्रांच्या तुलनेत भावना कमकुवत झाल्या आहेत. आरबीआयच्या मूक हस्तक्षेपामुळेही जलद घसरणीला हातभार लागला आहे. शुक्रवारी आरबीआय धोरण जाहीर झाल्यानंतर, बाजारांना मध्यवर्ती बँक चलन स्थिर करण्यासाठी हस्तक्षेप करेल की नाही याबद्दल स्पष्टतेची अपेक्षा आहे. तांत्रिकदृष्ट्या, रुपया खूप जास्त विकला गेला आहे आणि कोणत्याही अर्थपूर्ण पुनर्प्राप्तीसाठी ८९.८० च्या वर जाणे आवश्यक आहे.'

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >