Wednesday, December 3, 2025

महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दुसऱ्या अनुसूचित यादीत स्थान आरबीआयची घोषणा

महाराष्ट्र ग्रामीण बँकेला दुसऱ्या अनुसूचित यादीत स्थान आरबीआयची घोषणा

मोहित सोमण: महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आरबीआयच्या दुसऱ्या सूचीत (Second Schedule of RBI Act 1934) आपले स्थान टिकविण्यात यश मिळवले आहे. आरबीआयने क्षेत्रीय स्थानिक बँक (Regional Rural Bank) यादी जाहीर केली आहे ज्यामध्ये वगळण्यात आलेल्या व नव्याने समाविष्ट अथवा कायम राहणाऱ्या बँकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेने समावेश कायम राखला आहे. नव्याने जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेशिवाय आंध्रप्रदेश ग्रामीणा बँक, गुजरात ग्रामीण बँक, मध्यप्रदेश ग्रामीण बँक, ओडिशा ग्रामीण बँक, राजस्थान ग्रामीण बँक, उत्तरप्रदेश ग्रामीण बँक या बँकांचा समावेश असून जुन्या वगळलेल्या यादीत आंध्र प्रगती ग्रामीणा बँक, सप्तगिरी ग्रामीणा बँक,चैतन्य गोदावरी ग्रामीणा बँक, कर्नाटक ग्रामीण बँक, राजस्थान मरूधरा ग्रामीण बँक, बरोडा राजस्थान क्षेत्रीय ग्रामीण बँक, बरोडा युपी बँक, आर्यावर्त बँक, प्रथम युपी ग्रामीण बँक या बँकांचा समावेश आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा १९३४ कलम ४ भाग ३ मधील तरतुदीनुसार आरबीआय निकष पूर्ण करणाऱ्या बँकाना दुसऱ्या अनुसुचित यादीत समाविष्ट करते. या यादीत सहभागी बँकाना विशेषाधिकार प्राप्त होतात. प्रामुख्याने प्राथमिकता, कमी दरात आरबीआयकडून कर्ज, क्लिअरिंग हाउसेसची सदस्यता, इतर वित्तीय प्रणातीतील सेवांमध्ये प्राथमिकता असे लाभ प्राप्त होतात. यासाठी अर्थात काही निकष संबंधित बँकाना पूर्ण करावे लागतात. बँकेच्या आर्थिक स्थितीची तपासणी केल्यानंतर बँकेची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे वाढत असेल अथवा मजबूत असेल तसेच बँकेच्या मजबूत फंडामेंटलसह पेडअप भांडवल ५ लाख किंवा त्याहून अधिक असेल तर अशा बँकाना या अनुसूचित सहभाग मिळतो. अनुसूचित नसलेल्या बँकांना या यादीत समावेश मिळत नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >