मोहित सोमण: मिशो या बहुप्रतिक्षित आयपीओला पहिल्या दिवशी १.२२ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण पब्लिक इशूपैकी ३.४४ पटीने किरकोळ गुंतवणूकदारांकडून, ०.३९ पटीने पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून, १.३८ पटीने विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण १५०३६९५११ शेअर्सपैकी ५७६२७५८५ शेअरसाठी बिडिंग (बोली) लागल्याचे बीएसईने दिलेल्या माहितीत स्पष्ट झाले आहे. ५४२१ कोटी बूक व्हॅल्यु असलेल्या आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला असून ५ डिसेंबरपर्यंत हा गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. १०५ ते ११ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित करण्यात आली होती. एकूण आयपीओत ३८.२९ कोटी शेअरचा फ्रेश इशू असून उर्वरित १०.५५ शेअर ऑफर फॉर सेल साठी उपलब्ध आहेत. ८ तारखेला पात्र गुंतवणूकदारांना समभागाचे वाटप (Allotment) होऊ शकते तर १० डिसेंबरला बीएसई व एनएसईवर कंपनी सूचीबद्ध (Listed) होणार आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ७५%, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १०%, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
काल आयपीओपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून २४३९.५४ कोटींची गुंतवणूक प्राप्त केली होती. इ कॉमर्स कंपनी मिशोने इयर ऑन इयर बेसिसवर यापूर्वी २६% अधिक प्राप्त केला असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ११०३% घसरण झाली होती. तर तिमाही बेसिसवर कंपनीचा तोटा मार्च तिमाहीतील ३९४१ कोटींवरून घसरत सप्टेंबर तिमाहीत ७००.७२ कोटींवर पोहोचला होता. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५००९५.७५ रूपये आहे. कंपनीची शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ४६.७५ रूपये प्रिमियम दराने सुरु असून तज्ञांच्या मते कंपनीचा शेअर मूळ प्राईज बँड असलेल्या १११ रुपयांच्या तुलनेत ४२.१२% प्रिमियम सह १५७.१५ रूपये प्रति शेअर आसपास सूचीबद्ध होऊ शकतो.