पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा मुलगा जय पवार (Jay Pawar) यांचा विवाह सोहळा येत्या आठवड्यात बहरीनमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळ्याचे पर्व ४, ५ आणि ७ डिसेंबर रोजी बहरीनमध्ये रंगणार आहे. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या लग्नपत्रिकेनुसार, या चार दिवसांमध्ये पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पवार कुटुंबीयांचा हा मोठा सोहळा असला तरी, निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. पवार–पाटील कुटुंबीयांकडून केवळ ४०० पाहुण्यांनाच यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजित पवार यांचे मोठे स्थान असले तरी, या समारंभासाठी पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती समोर आली आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांच्या या खासगी विवाह सोहळ्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या विवाह सोहळ्यासाठी मागील काही दिवसांपासून पवार–पाटील कुटुंबीयांची आणि पाहुण्यांची तयारी जोरात सुरू असून संपूर्ण कार्यक्रम परदेशात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
दिबियापूर : पाणीपुरी हे सर्वांचेच आवडते खाद्य आहे, विशेषतः महिलांसाठी तो एक 'विक पॉईंट' असतो. पाणीपुरीच्या गाडीवर पुरूषांपेक्षा महिलांची गर्दी नेहमीच ...
- ४ डिसेंबर – मेहेंदी
- ५ डिसेंबर – हळदी, वरात आणि मुख्य लग्नसोहळा
- ६ डिसेंबर – संगीत
- ७ डिसेंबर – स्वागत समारंभ
नुकताच पार पडलेला युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा भव्य विवाह सोहळा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) आणि तनिष्का कुलकर्णी (Tanishka Kulkarni) यांचा बहुप्रतिक्षित भव्य विवाह सोहळा नुकताच (३० नोव्हेंबर) रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा विवाह सोहळा मुंबईतील बीकेसी (BKC) येथील जिओ सेंटर येथे अत्यंत दिमाखदार पद्धतीने पार पडला. या सोहळ्यासाठी राज्यातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. युगेंद्र पवार यांच्या विवाह सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी नवदाम्पत्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. पवार कुटुंबातील दोन पिढ्या एकत्र आल्यामुळे या सोहळ्याला खास महत्त्व प्राप्त झाले होते. युगेंद्र आणि तनिष्का यांचा विवाह सोहळा भव्यता आणि साधेपणाचा संगम ठरला.






