हरिद्वार : प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र यांना आता अंतिम निरोप देण्यात आला. कुटुंबियांच्या हस्ते धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. त्यांच्या निधनानंतर नऊ दिवसांनी कुटुंबाने हा विधी पार पाडला.
बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेता धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी ८९ व्या वर्षी निधन झाले. ते मागील अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पोकळी निर्माण झाली.
धर्मेंद्र यांच्या इच्छेप्रमाणे त्यांचे अंतिम संस्कार शांततेत करण्यात आले. यानंतर बुधवार ३ डिसेंबर २०२५ रोजी धर्मेंद्र यांच्या अस्थी हरिद्वार येथे विसर्जित करण्यासाठी आणल्या. अस्थींचे गंगेत विसर्जन करून त्यांना अंतिम निरोप देण्यात आला. सर्व विधी करताना धर्मेंद्र यांचे दोन्ही मुलगे म्हणजेच सनी आणि बॉबी उपस्थित होते .
पुजाऱ्यांच्या हस्ते सर्व विधी करण्यात आले, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाने विधींसाठी खासगी हॉटेल निवडले होते . अंतिम विधी सगळ्या माध्यमांपासून दूर ठेवण्यासाठी कुटुंबाने विशेष काळजी घेतली होती. बुधवारी, सकाळी 11 वाजताच्या कुटुंब हरिद्वारच्या श्रवणनाथ नगर परिसरातील पिलीभीत हाऊस घाटावर पोहोचले आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधीनुसार अस्थींचे गंगेत विसर्जन केले.
कुटुंबाला शांत पद्धतीने त्यांच्या इच्छेप्रमाणे कोणालाही न कळता, त्यांनी धर्मेंद्र यांच्या अंतिम विधी केल्या. तसेच घाटाच्या चारीबाजूला सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. विसर्जनानंतर देओल परिवार लगेचच मुंबईला येण्यासाठी रवाना झाले .






