Wednesday, December 3, 2025

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत ६७.६३ टक्के मतदान

मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांमधील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवार, दि. २ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एकूण २६३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी ६७.६३ टक्के मतदान झाले. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, या सर्व निवडणुकांचा एकत्रित निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मतदानाचे प्रमाण जिल्ह्यानुसार आणि शहरानुसार वेगवेगळे आहे. एकूण मतदान ६७.६३ टक्के असले तरी काही ठिकाणी ८८ टक्क्यांपर्यंत मतदान झाले, तर काही ठिकाणी ते ४९ टक्क्यांइतके कमी राहिले. आयोगाने सांगितले की, मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली असून, कुठेही गंभीर अनियमिततेच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या नाहीत.

...........

सर्वाधिक मतदान कुठे झाले ?

आयोगाच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण आणि डोंगराळ भागातील मतदारांनी या निवडणुकीत अधिक उत्साह दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नगरपंचायतींमध्ये अधिक मतदान नोंदवले गेले. येथील सरासरी मतदान सुमारे ८१ टक्क्यांच्या आसपास आहे.

- मुरगुड (कोल्हापूर): ८८% - मलकापूर (कोल्हापूर): ८७% - वडगाव (कोल्हापूर): ८६% - त्र्यंबक (नाशिक): ८६% - पन्हाळा (कोल्हापूर): ८५% - चिखलदरा (अमरावती): ८५% - सिंदखेड राजा (बुलढाणा): ८५% - माथेरान (रायगड): ८५% - सालेक्सा (गोंदिया): ८५% - चंदगड (कोल्हापूर): ८४%

.................

सर्वात कमी मतदान झालेली ठिकाणे

दुसरीकडे, काही शहरी आणि उपनगरीय भागात मतदानाचे प्रमाण कमी राहिले. पुणे आणि नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मतदान ५० टक्क्यांच्या खाली नोंदवले गेले.

- तळेगाव दाभाडे (पुणे): ४९% - बेसा पिपळा (नागपूर): ५१% - बुटिबोरी (नागपूर): ५३% - वाडी (नागपूर): ५३% - दिगडोह (देवी) (नागपूर): ५४% - बुलढाणा (बुलढाणा): ५४% - रत्नागिरी (रत्नागिरी): ५५% - बल्लारपूर (चंद्रपूर): ५५% - वनाडोंगरी (नागपूर): ५५% - भुसावळ (जळगाव): ५५%

………..

सिंधुदुर्गमध्ये किती मतदान ?

- कणकवली : ८०% - मालवण : ७४% - वेंगुर्ला : ७४% - सावंतवाडी : ६९%

Comments
Add Comment