सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२५ (Syed Mushtaq Ali Trophy Elite 2025) मध्ये सातत्याने अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केल्यामुळे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) मोठ्या प्रमाणात टीका होत होती. सलग तीन सामन्यांत फॉर्म नसल्यामुळे अनेकांनी त्याच्या क्षमतेवर आणि निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, या सर्व टीकेला वैभव सूर्यवंशीने चौथ्या सामन्यात आपल्या बॅटनेच योग्य उत्तर दिले. महाराष्ट्राविरुद्ध मैदानात उतरताच वैभवने जबरदस्त शतकी खेळी साकारली. त्याने फक्त ५८ चेंडूंत हे झंझावाती शतक पूर्ण केले. वैभवच्या या शतकाची खास गोष्ट म्हणजे, त्याने षटकार मारत आपली शतकी धावसंख्या पूर्ण केली. त्याने आपल्या शतकात जितके षटकार मारले, तितकेच चौकारही ठोकले. या आक्रमक खेळीमुळे त्याने टीकाकारांची तोंडे बंद केली असून, संघात आपला फॉर्म परतल्याचे सिद्ध केले आहे. वैभव सूर्यवंशीची ही वादळी खेळी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
🤯 The teenage sensation continues to impress 🤯
Vaibhav Suryavanshi smashed his first century in the Syed Mushtaq Ali Trophy against Maharashtra today. Reminder: He has one in IPL too 😎#SMAT #SMAT2025 pic.twitter.com/Dag48BBeER — Cricbuzz (@cricbuzz) December 2, 2025
६१ चेंडूंमध्ये ठोकल्या नाबाद १०८ धावा
महाराष्ट्राविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात बिहार संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून १७६ धावांचा टप्पा गाठला. या धावसंख्येत उपकर्णधार वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने केलेली एकहाती नाबाद १०८ धावांची खेळी सर्वात महत्त्वाची ठरली. वैभवने केवळ ६१ चेंडूंमध्ये नाबाद १०८ धावा ठोकल्या. त्याने १७७ पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने खेळलेल्या या इनिंगमध्ये ७ षटकार आणि ७ चौकार मारत आक्रमकतेचा परिचय दिला. ओपनर म्हणून मैदानात उतरलेल्या वैभवची बिपिन सौरभसोबत मोठी भागीदारी जमली नाही, तसेच त्यानंतर पीयूषसोबतही तो जास्त वेळ टिकू शकला नाही. मात्र, तिसऱ्या विकेटसाठी त्याने आकाश राज सोबत महत्त्वपूर्ण अर्धशतकी भागीदारी रचली. या भागीदारीमुळेच बिहार संघाने महाराष्ट्रासमोर एक चांगली आणि सन्मानजनक धावसंख्या उभी केली. वैभव सूर्यवंशीच्या उपकर्णधारपदाला साजेसा खेळ करत नाबाद १०८ धावा केल्यामुळे, संघाला आता सामन्यात चांगल्या स्थितीत राहण्याची संधी मिळाली आहे.
SMAT कारकिर्दीतील पहिलंच शतक
🚨 14-YEAR-OLD VAIBHAV SURYAVANSHI SMASHED 108* FROM JUST 61 BALLS IN SMAT 🤯 - 3rd T20 Hundred from just 16 matches, Madness. pic.twitter.com/gtji1opsvf
— Johns. (@CricCrazyJohns) December 2, 2025
वैभवने १४ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर आकाश राज बाद झाल्यानंतर (जेव्हा बिहारचा स्कोर ३ बाद १०१ होता) धावांचा वेग मोठ्या प्रमाणावर वाढवला. या निर्णायक क्षणी त्याने हात मोकळे करत अत्यंत जलद गतीने अर्धशतक पूर्ण केले आणि त्याच धडाक्यात शतकाची उंबरठाही पार केली. विशेष म्हणजे, स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत मिळून केवळ ३२ धावा करणाऱ्या वैभव सूर्यवंशीने चौथ्या सामन्यात हे तडाखेबाज शतक झळकावले. यामुळे त्याच्या फॉर्मवर टीका करणाऱ्यांना त्याने आपल्या बॅटनेच योग्य प्रत्युत्तर दिले. SMAT स्पर्धेतील त्याच्या कारकिर्दीतले हे पहिलेच शतक ठरले असून, या खेळीमुळे त्याने निवडकर्त्यांना आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) मतदान प्रक्रिया उत्साहात पार पडत आहे. या निमित्ताने सकाळपासूनच मतदारांमध्ये ...
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीच्या नावावर विश्वविक्रम
युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) महाराष्ट्राविरुद्ध शतक झळकावून केवळ एक सामना जिंकला नाही, तर जागतिक क्रिकेटच्या इतिहासात आपला ठसा उमटवला आहे! क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवल्यापासून तुफानी कामगिरी करणाऱ्या वैभवने आता इतिहास रचला आहे. तो वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी आणि फक्त १७ टी-२० सामन्यांमध्ये तीन टी-२० शतके झळकावणारा जगातील पहिला तरुण खेळाडू बनला आहे. क्रिकेटच्या इतिहासात कोणत्याही खेळाडूने इतक्या लहान वयात ही विक्रमी कामगिरी केलेली नाही. स्पर्धेतील पहिल्या तीन सामन्यांत अपेक्षेपेक्षा कमी कामगिरीमुळे वैभववर टीका झाली होती. मात्र, या टीकाकारांना आपल्या बॅटने उत्तर देत त्याने दमदार पुनरागमन केले आहे. हे शतक संघाचे मनोबल उंचावणारे असून, आगामी सामन्यांसाठीही तो तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.






