कोणी परदेशातून, कोणी घोड्यावरुन, कोणी गब्बरसिंहच्या वेशात आलं पण मतदान करुन गेलं, नवरदेवानं लग्नाआधी मतदान केलं

मुंबई : राज्यातल्या २६४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी मतदान झाले. लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगले सकारात्मक चित्र दिसले. कोणी परदेशातून आले तर कोणी घोड्यावरुन आले पण मतदान करुन गेले. हौशी मतदार आकर्षक वेशात आले आणि मतदानाचा हक्क बजावून गेले. आधी लगीन लोकशाहीचं मग आपलं असं म्हणत काही नवरदेवांनी आणि नवरदेवींनी लग्नाआधी मतदान करुन नव्या आयुष्याची सुरुवात सकारात्मक वातावरणात केली. मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच अशी होती. वेळ संपली असली तरी अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा असल्यामुळे मतदान अद्याप सुरू आहे. नियमानुसार मतदानाची वेळ संपते त्यावेळी रांगेत उभ्या असलेल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीची नोंद करतात आणि त्या व्यक्तीचे मतदान होईपर्यंत मतदान केंद्रावर प्रक्रिया सुरू असते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी उत्साहाने मतदान झाले.

मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आहे हे रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी झाल्यावर समजणार आहे. पण त्याआधी नागरिकांनी उत्साहाने त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी राडे झाले. पण या निवडक घटना वगळल्या तर सर्वत्र मतदारांचा उत्साह दिसला. ज्यांची लग्न होती अशा अनेक नवरदेवांनी आणि नवरदेवींनी लग्नाआधी मतदान करुन नवी सुरुवात केली. या तरुण तरुणींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना नागरिकांना मतदान करण्यासाठी आवाहन केले. मनमाडमध्ये शिवसेना उमेदवार रोहनने लग्न, मतदान आणि उमेदवार म्हणून निवडणूक नियोजन ही कसरत लिलया केली. नोकरीसाठी अमेरिकेत गेलेल्या अमेय सोमवंशीने बदलापूर नगरपालिकेसाठी मतदानाचा हक्क बजावला. वर्ध्यात अक्षय बहादूरकरने पुलगाव येथे नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान केले. धाराशिवच्या तुळजापूरमध्ये नवरदेव घोड्यावर बसून थेट मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आला. तुळजापूर शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील बूथवर जाऊन संकेत भोजनेनं मतदान केलं. पंढरपूरमध्ये गब्बरसिंगच्या पोषाखात येऊन दत्तात्रय सूर्यवंशी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
Comments
Add Comment

Spirituality to your everyday life : अध्यात्म म्हणजे जगापासून पळणे नव्हे, तर शांततेने जगणे; गौर गोपाल दास यांनी सांगितले दैनंदिन जीवनात अध्यात्म आणण्याचे ५ सोपे मार्ग

मुंबई : आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात 'अध्यात्म' हा शब्द ऐकला की, अनेकांना वाटते की यासाठी घरदार सोडून

LED fishing boats will be cancelled : एलईडी मासेमारी बोटींना डिझेल पुरवठा करणाऱ्या मच्छिमार संस्थांची नोंदणी रद्द करणार

मंत्री नितेश राणे यांचा इशारा; पारंपरिक मच्छिमारांना त्रास देणाऱ्यांची खैर नाही मुंबई :

Minister Adv. Ashish Shelar : कोकणातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास मान्यता - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : कोकणातील रत्नागिरी विभागातील कातळशिल्पांवर आंतरराष्ट्रीय दर्जाचा माहितीपट तयार करण्यास प्रशासकीय

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : उत्खनन रॉयल्टी, बिनशेती प्रक्रिया होणार डिजिटल

राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी मोठा दिलासा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रेडाईचे सर्व प्रश्न लावले

Revenue Minister Bawankule : अनेकदा व्हरांड्यात झोपलो पण हार मानली नाही..! महसूलमंत्री बावनकुळे आमदार निवासातील आठवणींत रमले

सुरक्षा रक्षक ते स्वीपर... सर्वांची आस्थेने विचारपूस मुंबई : राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात महसूलमंत्री

Pune News : थेट जमिनीवर आपटल्या अन्...; वॉटरपार्कमधील कमी पाणी महिलेच्या जीवावर बेतले, आयुष्यभराचे अपंगत्व

पुणे : वाढत्या उन्हाळ्यामुळे थंड पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले वॉटरपार्ककडे वळत असतानाच, शिरूर