मुंबई: बॉलिवूडमधील मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर पुन्हा एकदा डेटिंगच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे. यावेळी तिचे नाव एका लोकप्रिय क्रिकेटपटूसोबत जोडले गेले आहे. काही महिन्यांपूर्वी मृणाल सुपरस्टार धनुषसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा झाली होती. दोघांनीही याविषयी कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यानंतर आता एका ऑनलाइन पोस्टनंतर मृणालविषयी वेगळीच चर्चा रंगली. सोशल मीडीयावर व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, मृणाल आणि भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यर गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या पार्श्वभूमीवर मृणालने नुकतीच एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली असून यामुळे चाहत्यांमधील चर्चांना विरामचिन्ह मिळाले आहे.
मृणालने रविवारी (३० नोव्हेंबर) इन्स्टाग्राम स्टोरीजवर एक मजेशीर क्लिप शेअर केली. या स्टोरीच्या माध्यमातून सध्या तिच्याबद्दल सुरू असणाऱ्या गॉसिपबद्दलच ती उत्तर देत असावी असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मृणालची आई डोक्याला मसाज करतेय आणि दोघीही हसत आहेत. या व्हिडीओवर तिने कॅप्शन दिले की, 'ते बोलतात आणि आम्ही हसतो. अफवा या मोफत पीआर असतात आणि मला मोफत गोष्टी आवडतात.' या कॅप्शनमुळे मृणाल तिच्या आणि श्रेयस अय्यरच्या डेटींग अफवांबद्दल कोणतेच नाव न घेता बोलत असल्याचे दिसले.
कराची: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगात टाकून दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल त्यांच्या पक्षात आणि ...
काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर अशी पोस्ट व्हायरल झालेली होती की, मृणाल आणि श्रेयस अय्यरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून प्रेमाचे नातेसंबंध असून त्यांना हे नाते गोपनीय ठेवायचे आहे. तसेच सध्या ते त्यांच्या नात्याच्या प्राथमिक टप्प्यात असल्याचेही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र आता अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टनुसार, या दाव्यामध्ये काही तथ्य नसावे असे वर्तवण्यात येत आहे.






