मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या २६४ जागांवर आज होणाऱ्या मतदानात अनेकांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. ज्याचा निकाल उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला लागणार असल्याचे निवडणूक आयोगाने आधीच जाहीर केले आहे. मात्र ऐन मतदानाच्या दिवशी मुंबई उच्च न्यायालयातून एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाने जाहिर केल्याप्रमाणे आज मतदान होत असले तरी निकालासाठी अजून १९ दिवसांची वाट पाहावी लागू शकते, अशी माहिती या अपडेटमधून समोर येत आहे.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासून अगदी मतदार यादीपासून प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर आले आहेत. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेतला घोळ समोर आल्यानंतर राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकींमधील काही नगर परिषदा आणि नगर पंचायतीचे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. उर्वरित ठिकाणी जाहिर केल्याप्रमाणे आजच मतदान पार पडत आहे.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या चौकशीबाबत एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. ...
ज्या ठिकाणचे मतदान पुढे ढकलले आहे, तिथे २० डिसेंबरला मतदान होणार असून त्याचा निकाल २१ डिसेंबरला लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील निवडणूकीच्या सर्वच ठिकाणचा निकाल २१ डिसेंबरला एकत्रित लावता येईल का? अशी महत्त्वपूर्ण मागणी औरंगाबाद खंडपीठाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन आज दुपारी साडेबारा वाजेपर्यंत निवडणूक आयोग खंडपीठाकडे देणार आहे. त्यामुळे आज मतदान होत असले तरी याचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न पडला आहे.






