Sunday, November 30, 2025

संसदेचे आजपासून हिवाळी अधिवेशन

संसदेचे आजपासून हिवाळी अधिवेशन

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान होणार आहे. तत्पुर्वी, रविवारी राजधानी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक पार पडली. यात केंद्र सरकारने आपला अजेंडा जाहीर केला. यंदाच्या अधिवेशनात सरकार अनेक महत्त्वपूर्ण कायदे बदल, आर्थिक सुधारणा, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित विधेयके सादर करणार आहे. सरकारने लोकसभा आणि राज्यसभेसाठी १४ विधेयकांची यादी तयार केली आहे.

Comments
Add Comment