Sunday, November 30, 2025

ऐका निसर्गाच्या हाका

ऐका निसर्गाच्या हाका

नेमेचि येतो पावसाळा' हे वचन आता इतिहासात राहिले आहे. सध्या पाऊस भारतीय उपखंडात आणि दक्षिण भारतात वाढत चालला आहे आणि त्याचबरोबर त्याच्या साथीने येणारी चक्रीवादळे, जमिनीचे खच्चीकरण आणि धूप थांबणे आणि हिमस्खलन वगैरे प्रकार नित्यनेमाने घडत असतात. आता 'दितवाह' हे चक्रीवादळ येऊ घातले आहे आणि दक्षिण भारतात म्हणजे तामिळनाडू आणि पुद्दुचेरी आदी राज्यांत या वादळाचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे या भागात तुफानी पाऊस आणि झाडांची पडझड वगैरे वगैरे दिसून आले. पण या 'दिटवाह'बरोबरच केवळ तामिळनाडूच नव्हे तर इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया आणि श्रीलंका या देशांत जबरदस्त तबाही माजली आहे आणि श्रीलंकेत तर कित्येकजण या आपत्तीत बेपत्ता झाले आहेत. उष्ण कटिबंधीय प्रदेशात या वादळांमुळे पूरपरिस्थिती ओढवली आहे आणि इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड आणि श्रीलंकेत अक्षरशः हाहाकार माजला आहे. 'दिटवाह'मुळे प्रचंड पाऊस, पूर आणि भूस्खलन अशी संकटे आली आहेत, तसेच त्याचे मुख्य कारण बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र हेच आहे. या वादळाला वातावरणीय अनुकूल परिस्थितीमुळे तीव्र चक्रीवादळात त्याचे रूपांतर झाले. सामान्यपणे असे सांगता येईल, की या चक्रीवादळाला कारण झाले ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि त्यासाठी कारण होते ते समुद्राच्या पृष्ठभागावरील उष्णता आणि वातावरणातील दमटपणा. पण सर्वात भीषण परिणाम लंकेवर झाला आणि हे वादळ श्रीलंकेच्या किनाऱ्यावर आदळले आणि तेथे अतोनात मनुष्यहानी झाली आणि त्या गरीब देशाला त्याचे नुकसान सोसावे लागले.

या चक्रीवादळामुळे तामिळनाडूत फारशी हानी झाली नसली आणि लोक वेळीच सुरक्षित ठिकाणी गेल्याने वाचले आहेत. पण श्रीलंकेतील लोक मात्र तितके सुदैवी ठरले नाहीत आणि परिणामी तेथे १५० लोक बळी गेले, तर १५००० घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचसोबत रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संपूर्ण श्रीलंका या वादळात उद्ध्वस्त झाली आहे आणि १०० हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला असल्याचे सागण्यात येते, तर कित्येक लोक कोलंबो आंतरराष्ट्रीय विमानतळावर अडकले आहेत. यावरून या घटनेचे गांभीर्य लक्षात यावे. श्रीलंकेतील चक्रीवादळामुळे हाहाकार माजला असून भारतालाही याचा धोका निर्माण झाला आहे. हवाई सेवा ठप्प झाली असून तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना प्रवाशांना भारतात सुखरूप परत आणण्याचे आश्वासन द्यावे लागले. समुद्र शांत असतो तेव्हा तो चांगलाच शांत असतो. पण त्याच्या पोटात काय दडले आहे ते कुणीच सांगू शकत नाही, हेच 'दितवाह'ने सांगून टाकले आहे. दोन दिवसांपूर्वी हे संकट घोंघावत होते आणि आता त्याने चक्रीवादळाचे अक्राळविक्राळ रूप घेतले आहे. त्याबरोबर संपूर्ण श्रीलंका आणि तामिळनाडू यांना आपल्या कवेत घेतले आहे. साहजिकच माणूस नावाचा प्राणी त्यात सापडला नसता तरच नवल. लंकेबरोबरच भारतावर ही विनाशाची सावली पडली आहे. श्रीलंकेत झालेला पावसाचा प्रलय भारताकडे सरकत आहे आणि पुढील १२ तासांत ते आणखी सक्षम होणार आहे. याचा अर्थ भारताला आता चक्रीवादळाच्या संकटाला सामारे जावे लागणार आहे. आधी सेन्यार चक्रीवादळ आले आणि त्यात इंडोनेशियात तीनशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आता श्रीलंकेत हजारो लोक बळी पडण्याची शक्यता आहे. 'दितवाह' आणि 'सेन्यार'मुळे इंडोनेशिया आणि श्रीलंकेत जी तबाही माजली आहे त्यामुळे उष्णकंटिबंधीय चक्रीवादळाचे परिणाम लगेच लक्षात येतात. मुसळधार पाऊस, आंतरराष्ट्रीय नौवहन विकस्ळीत होणे आणि जहाजे नष्ट होणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. हवामानातील बदल हा लाखो लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. दोन वर्षांपूर्वी हवामान परिषद भरली होती आणि त्यावेळी भारताने आश्वासन दिले होते, की हवामानातील बदलावर भारत आपला वाटा उचलेल. पण अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांनी आपले आश्वासन पाळले नाही आणि ऐनवेळी त्यातून माघार घेतली. परिणामी हवामानातील बदल हा विषय आजही धनाढ्य लोकांसाठी फारसा महत्त्वाचा नाही पण भारतासारख्या देशातील लोकांसाठी तो जिव्हाळ्याचा आणि जीवनमरणाचा राहिला आहे. भारतातील बहुतेक लोक आज समुद्राच्या काठी वास्तव्य करतात आणि त्यांच्यासाठी हवामान बदल हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

'दितवाह'सोबत तामिळनाडूत प्रचंड नुकसान होण्याची आशंका व्यक्त केली जात आहे आणि ते कधीही तामिळनाडूच्या किनाऱ्यावर आदळू शकते. तटीय आंध्र प्रदेश आणि रायलसीमा यनम आदी भागात जबरदस्त पावसाची अपेक्षा आहे. भारतात आता वादळांची पूर्वसूचना देण्याचे प्रकार पुरेसे आगाऊच कळत असल्यामुळे लोकांना त्या प्रदेशात जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे, तसेच मच्छीमारांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा फारसा परिणाम होणार नाही. त्यातल्या त्यात ही सुखद बातमी आहे. केवळ गडचिरोली जिल्ह्यात हलका पाऊस होईल. श्रीलंकेला भारताने मदत पाठवली आहे आणि त्यात मोदींनी मानवतेचे दर्शन घडवले आहे. पण भारतीय हवामान खात्याने तीन राज्यांना अलर्ट जारी केला आहे. उपाय कितीही केले गेले असले तरीही वारंवार चक्रीवादळे येण्यामागे हवामान बदल आणि मानवी हस्तक्षेप हीच प्रमुख कारणे आहेत. त्याशिवाय अनियोजित शहरी विकास आणि खारफुटीच्या जंगलांचा विनाश ही कारणे यामागे आहेत. या कारणांचा विचार केला जाऊन त्यावर उपाययोजना केली गेली तरच लाखो भारतीय लोकांचा जीव वाचेल. समुद्राचे तापमान वाढल्यानेही चक्रीवादळे येतात हे समोर आले आहे. हवामान सर्वत्रच अस्थिर झाले आहे आणि पावसाळा यंदा कधी नव्हे तो लांबला आहे. त्यात आता चक्रीवादळाचे संकट आले आहे, त्यामुळे लोक आणि शेतकरी त्यांची पाळीव जनावरे सर्वांचे प्राण संकटात आहेत. त्याला उपाय म्हणजे आपली विकासाची लालसा थांबवली पाहिजे आणि निसर्गाचा आदर केला पाहिजे. तसे झाले तरच आपण भविष्यात सुरक्षितपणे जगू शकू. हे चक्रीवादळ उतरताना डावीकडे सरकत असून याचा परिणाम तेथेही जाणवतो. ही चक्रीवादळे अत्यंत विनाशकारी आिण प्राणघातक असू शकतात आिण वेळेवर खबरदारी घेतल्यास लेकांना जीवही वाचवता येतो. दिटवाह हे चक्रीवादळ विनाशकारी आहे. श्रीलंकेत विनाशही घडविला आहे. पण तामिळनाडूला त्याचा फारसा परिणाम जाणवलेला नाही.

Comments
Add Comment