परवापासून बहुप्रतिक्षित ५४२१ कोटीचा मिशो आयपीओ बाजारात,आयपीओ सबस्क्राईब करावा का? जाणून घ्या

मोहित सोमण: ई कॉमर्स क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी मिशोचा आयपीओ (IPO) परवा ३ डिसेंबरपासून बाजारात गुंतवणूकदारांसाठी दाखल होत आहे. ३ डिसेंबर ते ५ डिसेंबर कालावधीत हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध राहणार आहे. ५४२१.२० कोटी रुपयांचा हा दिग्गज आयपीओ ८ डिसेंबरपर्यंत निश्चित (Allotment) होणार असून बीएसई व एनएसईवर १० डिसेंबरला आयपीओ सूचीबद्ध (Listed) होणार आहे. १०५ ते १११ रूपये प्रति शेअर प्राईज बँड आयपीओसाठी निश्चित करण्यात आली आहे. किरकोळ (Retail) गुंतवणूकदारांसाठी १४९८५ रूपयांची म्हणजेच १३५ शेअरच्या लॉटची गुंतवणूक आयपीओसाठी अनिवार्य करण्यात आली आहे. एकूण ५४२१.२० कोटींच्या आयपीओसाठी ४८८३९६७२१ इतक्या शेअरचा हा पब्लिक इशू असून त्यापैकी ४२५० कोटीचे शेअर फ्रेश इशू असून उर्वरित ११७१.२० कोटींचे शेअर ऑफर फॉर सेलसाठी उपलब्ध असणार आहेत. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी ७५% वाटा, किरकोळ गुंतवणूकदारांसाठी १०% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असणार आहे.


२०१५ मध्ये स्थापन झालेले, मिशो लिमिटेड हे भारतातील ई-कॉमर्स तंत्रज्ञान प्लॅटफॉर्म आहे. ग्राहक, विक्रेते, लॉजिस्टिक्स भागीदार आणि कंटेंट क्रिएटर्स यांना सोबत घेऊन कंपनी कार्यरत आहे. कंपनीचे ई-कॉमर्स मार्केटप्लेस मिशो या ब्रँड नावाखाली चालवते, ज्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी (Product Line) उपलब्ध आहे आणि विक्रेत्यांना देखील त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी चांगले व्यासपीठ या निमित्ताने मिळते.


हा बहुप्रतिक्षित आयपीओ येण्यापूर्वी कंपनीने मजबूत ऑपरेशनल वाढ दर्शविली आहे. कंपनीच्या ऑर्डरमध्ये सतत वाढही झालेली आकडेवारीतून दिसली आणि व्यवहार करणाऱ्या युजरचा आणि विक्रेत्यांचा आधार वाढत आहे. उपलब्ध माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या बारा महिन्यांत, मिशोकडे ७०६४७१ वार्षिक व्यवहार करणारे विक्रेते आणि २३४.२० दशलक्ष वार्षिक व्यवहार करणारे ग्राहक (युजर) होते.


व्हॅल्मो अंतर्गत चालवले जाणारे कंपनीचे लॉजिस्टिक्स नेटवर्क संपूर्ण भारतात उपलब्ध आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मिशोने २०८२ पूर्ण-वेळ कर्मचारी नियुक्त केले होते. कंपनीने खर्च आधारित कार्यक्षमता आणि तांत्रिक नवोपक्रमावर विशेष लक्ष केंद्रित केल्याने तिला डिजिटल इकोसिस्टमचा विस्तार करण्यासाठी नवीन व्यवसाय वर्टिकलमध्ये धोरणात्मक गुंतवणूक करताना सकारात्मक रोख प्रवाह स्थिती राखण्यास सक्षम केले आहे असे तज्ञांचे मत आहे.


उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २६% वाढ झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात ११०३% घसरण झाली आहे. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल (Market Capitalisation) ५००९५.७५ कोटी रूपये असून विदित अत्रे, संजीव कुमार कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर क्लाऊड तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यासाठी, एमटीपीएल तंत्रज्ञानात गुंतवणूकीसाठी, मार्केटिंग, ब्रँडिंगमधील खर्चासाठी, कंपनीच्या व्याप्तीसाठी, इतर अधिग्रहणासाठी, व दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.


या आयपीओत गुंतवणूक करावी का? तज्ञ काय म्हणतात?


बाजार व आयपीओतज्ज्ञ दिलीप दावडा यांनी म्हटले आहे की,' एमएल (Meesho Limited) भारतात बहुपक्षीय (Multiplatform). तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर चालणारे ई-कॉमर्स क्षेत्रीय सेवा प्रदान करत आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षात, कंपनीने तिच्या वरच्या टॉपलाईनमध्ये वाढ नोंदवली परंतु तिची नफा पातळी मात्र खाली सरकत राहिली. भारतातील ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये ऑर्डर आणि वार्षिक व्यवहार युजर आधारावर कंपनी आघाडीवर आणि सर्वात मोठा प्लॅटफॉर्म असल्याचा दावा करते. अलीकडील आर्थिक डेटाच्या आधारे, आयपीओची किंमत नकारात्मक पी/ई (Price to Equity) आक्रमक (Aggressive) ठेवण्यात आली आहे. केवळ सुज्ञ/रोख अधिशेष (Cash Surplus), जोखीम शोधणारेच दीर्घकालीन निधी मध्यम प्रमाणात ठेवू शकतात, इतर दूर राहू शकतात.


कंपनीच्या शेवटची जीएमपी (Grey Market Price GMP) ११ रूपये मूळ प्राईज बँडपेक्षा ३७.३९% सह १५२.५ रूपयांवर सुरु होती. काही तज्ञांच्या मते कंपनीचा शेअर ३५% प्रिमियम दरासह सूचीबद्ध होऊ शकतो.

Comments
Add Comment

Venezuela Earthquakes : ढिगाऱ्याखालून चक्क १८ दिवसाच्या बाळाची सुखरूप सुटका; बचावपथकाची मोठी कामगिरी

व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर दिलासादायक बातमी समोर आली आहे. ला ग्वायरा परिसरात कोसळलेल्या

Ketan Agrawal Murder Case : क्रिकेटचं मैदान ते हत्येचा कट; २००० कॉल्स, २३८ तास संवाद अन् सिया-चेतनच्या अफेअरची 'इनसाईड स्टोरी' उघड!

पुणे : पुण्याजवळील लोहगड किल्ल्याच्या भयावह दरीत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) या तरुणाला ढकलून दिलेल्या प्रकरणाचा तपास

Nashik : 'त्या' मुलीच्या मृत्यूप्रकरणी हलगर्जी आढळल्यास फौजदारी, आमदार हिरेंचे सक्त आदेश

Nashik : सिडको खुटवडनगर येथील एचपीव्ही लसीकरण शिबिरानंतर १७ वर्षीय श्रावणी अनिल पाटील या निष्पाप मुलीचा झालेला

सन्मानाचा अंतिम निरोपही डावलला , बेवारस मृतदेहाचा अंतिम प्रवास चक्क कचऱ्याच्या घंटागाडीतून ; कुठे घडला संतापजनक प्रकार

Jalgaon  : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका

Commonwealth Games 2026 Mirabai Chanu : ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू करणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टिंग संघाचे नेतृत्व

नवी दिल्ली : ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघाची घोषणा

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन वळण; सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हाती प्रकरणाची धुरा

पुणे : बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्यायालयीन लढाईला आता नवे वळण मिळाले आहे. एकीकडे आरोपी सिया