काँगोत भीषण दुर्घटना ! किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने २० जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता

दक्षिण आफ्रिका  : देश काँगोत पुन्हा एक मोठी दुर्घटना घडली आहे. किनाऱ्याजवळ बोट उलटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक बेपत्ता असल्याचे वृत्त मिळाले आहे. या अपघातापूर्वी महिन्याच्या सुरुवातीलाच एक अपघात घडला होता. सततच्या वाढत्या बोट अपघातामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काँगोच्या वायव्य भागात माई-न्डोम्बे सरोवरात हा अपघात घडला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बोट राजधानवी किन्शासा येथे उलटली आहे. यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (२७ नोव्हेंबर) रात्री ८ च्या सुमारास बोबेनी आणि लोबेके गावांत ही घटना घडली होती. या अपघातात २० मृतदेह बाहेर काढण्यात आले असून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे. सध्या बोटीतील प्रवाशांची संख्या अस्पष्ट आहे.


मात्र अपघातात २० जणांचा मृत्यू झाल्याचे निवदेन काँगो सरकारने जारी केले आहे. याच वेळी माई-न्डोम्बे प्रदेशाचे गव्हर्नर केवानी न्कोसो यांनी, मृतांचा संख्या आणि वाचलेल्यां संख्या सध्या स्पष्ट झालेली नाही. बचाव पथकाकडून बेपत्ता लोकांचा शोध सुरु आहे, यानंतर सर्व तपशील मिळतील असे गव्हर्नरने म्हटले आहे.


काँगोत बोट अपघाताच्या घटना आता सामान्य झाल्या आहेत. काँगोत जलमार्गच लोकांसाठी प्रवासाचे मुख्य साधन आहे. देशातील बहुतेक रस्ते खराब अवस्थेत आहेत किंवा वापरण्यासाठी योग्य नाहीत. यामुळे प्रवासासाठी नागरिक नदी प्रवासावर अवलंबून आहेत. मात्र, बोटींच्या सुरक्षिततेवर दुर्लक्ष होत आहे. बोटींची तपासणी वेळवर होत नाही, तसेच अनधिकृत बोटीही मोठ्या प्रमाणावर चालवल्या जातात. गेल्या काही वर्षात काँगोत अनेक बोट अपघात झाले आहेत.


या अपघातांमध्ये आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. शिवाय रात्रीच्या वेळी प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच बोट उलटण्याने ६४ लोक बेपत्ता झाले होते, तर त्यापूर्वी घडलेल्या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता, तर एप्रिल मध्ये दोन अपघात घडले होते. ज्यामध्ये १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

Comments
Add Comment

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

भारताने मुरीदकेत हल्ला केला तर चूक काय? पाकिस्तानी मौलानांचा आर्मी चीफ मुनीरांना थेट सवाल

कराची : कराचीतील ल्यारी भागात बसून पाकिस्तानचे ज्येष्ठ धर्मगुरू आणि जमियत उलेमा-ए-इस्लाम (फजल)चे अध्यक्ष मौलाना

अमेरिकेतील नोकऱ्यांवर टांगती तलवार

एच१बी व्हिसाच्या नव्या नियमांमुळे शेकडो नागरिक अडकले भारतातच वॉशिग्टन : अमेरिकेत नोकरी करणारे शेकडो भारतीय एच१