Monday, December 1, 2025

Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru Wedding : भरजरी साडीत नववधू समंथा! अभिनेत्री समंथा प्रभूनं निर्माते राज निदिमोरूंसोबत गुपचूप उरकलं दुसरं लग्न; फोटो सोशल मीडियावर शेअर

Samantha Ruth Prabhu-Raj Nidimoru Wedding : भरजरी साडीत नववधू समंथा! अभिनेत्री समंथा प्रभूनं निर्माते राज निदिमोरूंसोबत गुपचूप उरकलं दुसरं लग्न; फोटो सोशल मीडियावर शेअर

साऊथची लोकप्रिय सुपरस्टार अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) हिने चाहत्यांना मोठा धक्का देत गुपचूप दुसरं लग्न उरकलं आहे. समंथानं प्रसिद्ध वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'चे (The Family Man) निर्माते राज निदिमोरू (Raj Nidimoru) यांच्यासोबत विवाह केला आहे. समंथा आणि राज यांचा लग्नसोहळा तामिळनाडूतील कोइम्बतूर येथील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रात (Isha Yoga Center) गुपचूप पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते. अत्यंत साधेपणाने आणि खासगी पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडल्याची चर्चा आहे. विवाहानंतर समंथानं स्वतः सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. पहिल्या फोटोमध्ये राज निदिमोरू समंथाच्या हातात अंगठी घालताना दिसत आहेत. समंथानं या फोटोंना "1-12-2025" अशी कॅप्शन दिली आहे. आपल्या लग्नासाठी समंथानं लाल रंगाची साडी परिधान केली होती, ज्यात तिचा लूक खूपच सुंदर दिसत होता. समंथा आणि राज निदिमोरू यांच्या लग्नाची ही बातमी सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांकडून या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

समंथा-राजच्या लग्नाचे खास फोटो व्हायरल...

 
View this post on Instagram
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

नववधू समंथानं आपल्या विवाह सोहळ्यासाठी लाल रंगाची साडी परिधान केली होती. या पारंपरिक लूकमुळे समंथाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं आणि चाहत्यांकडून तिच्या ब्रायडल लूकचं विशेष कौतुक होत आहे. राज निदिमोरू यांनीही अत्यंत साधेपणातील, पण आकर्षक लूक निवडला होता. त्यांनी पांढरा कुर्ता-पायजमा वेअर केला होता आणि त्यावर बेज (Beige) रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. त्यांचा हा पारंपरिक वेश समारंभाला साजेशी होता. या व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये समंथा आणि राज लग्नाचे विधी करताना दिसत आहेत. कोइम्बतूरमधील ईशा योग केंद्रात पार पडलेला हा खास विवाह सोहळा त्यांच्या फोटोंमधून चाहत्यांना पाहायला मिळाला आहे.

कोण आहेत राज निदिमोरू?

राज निदिमोरू यांना खरी लोकप्रियता 'द फॅमिली मॅन' (The Family Man) या गाजलेल्या वेब सीरिजमुळे मिळाली. त्यांनी कृष्णा दसरकोथापल्ली यांच्यासोबत या सीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. या जोडीने अलीकडेच 'फरझी' (Farzi) आणि 'सिटाडेल: हनी बनी' (Citadel: Honey Bunny) सारख्या मोठ्या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. याशिवाय, त्यांनी 'गन्स अँड रोझेस' सारख्या प्रोजेक्ट्सवरही काम केले आहे. राज निदिमोरू यांनी अनेक उल्लेखनीय चित्रपट दिग्दर्शित केले आहेत, ज्यात '९९', 'शोर इन द सिटी', 'गो गोवा गॉन', 'हॅपी एंडिंग' आणि 'अ जेंटलमन' यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २०१८ मध्ये बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या 'स्त्री' (Stree) या चित्रपटाचे लेखन देखील त्यांनी केले होते. या त्यांच्या अष्टपैलू योगदानामुळे राज निदिमोरू यांचे चित्रपट आणि ओटीटी क्षेत्रात मोठे स्थान आहे.

राज यांच्या घटस्फोटीत पत्नीची 'ती' पोस्ट चर्चेत

राज निदिमोरू यांच्या पहिल्या पत्नी Sshyamali De यांनी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे कोणाचेही नाव घेतले नसले तरी, त्याचा संदर्भ राज यांच्या लग्नाकडे असल्याचे मानले जात आहे. Sshyamali De यांनी लिहिले होते की, "desperate people do desperate things..." (म्हणजेच, 'निराश झालेले लोक निराशेचे कृत्य करतात'). Sshyamali De यांच्या या पोस्टनंतरच समंथा आणि राज यांच्या लग्नाच्या चर्चांनी अधिक जोर धरला होता. राज निदिमोरू आणि Sshyamali यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला होता. समंथा आणि राज यांच्या विवाहानंतर Sshyamali De यांची ही पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >