Monday, December 22, 2025

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

Para-athlete...लग्नातील किरकोळ वादातून हरियाणातील पॅरा-अ‍ॅथलिटची निर्घृण हत्या

हरियाणा : रोहतक येथे एका राष्ट्रीय स्तरावरील पॅरा-अ‍ॅथलिटवर झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नातील एका किरकोळ वादातून संतप्त झालेल्या काही तरुणांनी पॅरा-अ‍ॅथलिट रोहित धनखरवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रोहितचा शनिवारी पंडित बीडी शर्मा पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये मृत्यू झाला.

२७ नोव्हेंबर रोजी रोहित आणि त्याचा मित्र जतिन रेवाडी खेड्यातील नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. समारंभादरम्यान काही मुलांच्या अयोग्य वर्तनावर रोहितने आक्षेप घेतला आणि त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी उपस्थित नातेवाईकांनी परिस्थिती शांत केली. परंतु लग्नानंतर रोहतकला परतताना हा वाद गंभीर स्वरूपात बदलत गेला.

रोहित आणि जतिन गाडीतून परतत असताना, संशयित आरोपींनी त्यांच्या कारचा पाठलाग केला. प्रथम गाडीवर मागून जोरदार धडक देण्यात आली आणि नंतर १५ ते २० जणांनी गाडी थांबवून रोहितला बाहेर ओढले. आरोपींनी रॉड आणि हॉकी स्टिकने त्याची निर्दय मारहाण केली. रोहित गंभीर जखमी झाला असून त्याचा मित्र जतिन कसाबसा तिथून पळून सुटला.

जखमी अवस्थेत रोहितला प्रथम भिवानी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती खालावल्याने त्याला रोहतकला हलवण्यात आले. दोन दिवसांनंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.रोहितचा मित्र जतीन याने सांगितले की, " लग्नात झालेल्या वादानंतर परिस्तिथी शांत झाली होती. मात्र घरी परतत असताना तरुणांनी गाडी अडवून हल्ला केला. रेल्वे क्रॉससिंगवर गाडीला मागून जोरात धक्का दिला. मी पळून जाण्यात यशस्वी झालो. पण आरोपींनी रोहितला लक्ष केले. या हल्ल्याबाबत पोलीस स्टेशन यामध्ये तक्रार दाखल केली असून लवकरच आरोपींना ताब्यात घेण्यात येईल.

Comments
Add Comment