महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या एसयुव्ही कार विक्रीत लक्षणीय २२% वाढ

मोहित सोमण: महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विक्रीत वाढ अपेक्षित होती. त्यात धर्तीवर कंपनीने आज आकडेवारी जाहीर केली. कंपनीच्या एसयुव्ही (Sports Utility Vechile SUV) गाड्यांच्या विक्रीत इयर ऑन इयर बेसिसवर २२% वाढ झाल्याचे कंपनीच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे. यंदा ही वाढ ऑटोमोबाईल क्षेत्रात महत्वाची असून कंपनीच्या विक्रीत सुधारणा झाल्याने एसयुव्हीला येणारी वाढती मागणी अधोरेखित होते. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी कपातीची घोषणा करताच मोठ्या प्रमाणात ऑटो कंपनीच्या महसूलात, मागणीत, विक्रीत वाढ होत आहे. दरकपातीत एसयुव्हीला १५०० सीसी मर्यादित असलेल्या गाड्यांच्या जीएसटीत ५०% वरून ४०% दरकपात केली गेली होती. त्यामुळे या गाड्यांच्या किंमती घसरल्याने मोठ्या प्रमाणात विक्रीत वाढ झाल्याने आज अखेर महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या विक्रीत तब्बल २२% वाढ झाली आहे. तसेच माहितीनुसार, कंपनीच्या एकूण एसयुव्ही गाड्यांच्या पोर्टफोलिओत ८०% गाड्या १५०० सीसीवरील आहेत. अद्याप इतर महत्वाच्या मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई मोटर्स यांची आकडेवारी जाहीर झालेली नाही मात्र महिंद्रा कंपनीच्या या चांगल्या प्रदर्शनामुळे कंपनीच्या गाड्यांच्या मागणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. कारण प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार नोव्हेंबर महिन्यातच लाँच झालेल्या एसयुव्हीत तब्बल ५६३३६ गाड्यांची विक्री झाली होती.


महिंद्रा अँड महिंद्रा देशांतर्गत प्रवासी वाहन विभागात आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी, अंतर्गत ज्वलन इंजिनवर चालणाऱ्या एसयुव्ही आणि इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश असलेल्या प्रीमियम आणि भिन्न वाहने ऑफर करण्याच्या धोरणावर टिकून राहण्याची योजना आखत आहे असे कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. उत्पादन श्रेणीत सीएनजी आणि इतर पर्यायी इंधन तंत्रज्ञान आणण्याची कोणतीही तात्काळ योजना नाही कारण त्यांना त्यांच्या मुख्य ब्रँड ओळखीशी टिकून राहायचे आहे आणि विविध प्रकारची उत्पादने शोधणाऱ्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत असे कंपनीच्या वतीने सांगण्यात येत आहे.


याविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना,'आमचे लक्ष आयसीई आणि इलेक्ट्रिकवर आहे आणि आम्ही या क्षेत्रांमध्ये बऱ्यापैकी वाढ करत आहोत. आमच्या वैयक्तिक वाहन पोर्टफोलिओमध्ये, ग्राहकांना भिन्न उत्पादने हवी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत राहायचे नाही' असे महिंद्रा अँड महिंद्रा अध्यक्ष -ऑटोमोटिव्ह बिझनेस आर वेलुसामी यांनी म्हटले. त्यांनी पुढे नमूद केले आहे की कंपनी पुढील चार वर्षांत अनेक मॉडेल्समध्ये नव्या योजनांसह एसयूव्ही विभागांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे.

Comments
Add Comment

रतन टाटा यांचा सेशेल्समधील विला विक्रीसाठी

मुंबई : रतन टाटा यांचा सेशेल्समधील आलिशान बीचफ्रंट विला आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. माहे बेटाच्या शांत, नयनरम्य

राज्यात तीन दिवसांसाठी ड्राय-डे

नवी दिल्ली : राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी आजपासून तीन दिवसांसाठी ड्राय डे असणार आहे.

नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत भाजप १७५ जागा जिंकणार?

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेतील आकडेवारी समोर मुंबई  : राज्यभरातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या

डहाणू नगर परिषद निवडणुकीत थेट लढत!

पालघर, वाडा, जव्हारमध्ये तिरंगी लढत पालघर : नगर परिषद, नगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक

महाडमध्ये वृद्ध महिलेची हत्या; २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश

महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे

डोंबिवलीत मनसेला खिंडार!

दोन माजी नगरसेवक व नगरसेविका भाजपमध्ये डोंबिवली  : मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष आणि डोंबिवली पश्चिमेतील