मोहित सोमण: जीएसटी कर संकलनात (GST Collection) मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या महिन्यात जीएसटी कर संकलन ०.७% वाढत १.७ लाख कोटीवर पोहोचल्याचे सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीत म्हटले आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मध्ये हे संकलन १.६९ लाख कोटी रुपये होते. मोठ्या प्रमाणात जीएसटी दर कपात झाल्याने मोठ्या प्रमाणात वस्तूंच्या उपभोगात, बचतीत, खर्चात वाढ झाली होती. अतिरिक्त तरलता (Liqudity) वाढल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात कर संकलनात वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. सप्टेंबर २२ पासून जीएसटी तर्कसंगतीकरण (GST Rationalisation) लागू झाले होते. त्यामुळे संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात कर संकलन वाढले. केवळ घरगुती कर संकलनात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) २% वाढ झाली आहे. त्यामुळे हे संकलन १.२४ लाख कोटींवर पोहोचले आहे.
याशिवाय माहितीनुसार, आयातीतून वाढलेल्या कर संकलनात १०% वाढ झाल्याने हे संकलन ४६००० कोटीवर पोहोचले. जीएसटी परतावा (GST Refund) मध्ये मात्र संमिश्रित कल पहायला मिळाला आहे कारण या संकलनात इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तुलनेत ४% घसरण झाली आहे जे १८१९६ कोटींवर पोहोचले. निर्यातीतील परतावा (Export Refund) इयर ऑन इयर बेसिसवर ३.५% वाढले आहे. निव्वळ जीएसटी महसूल (Net GST Revenue) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर नोव्हेंबर महिन्यात १.३% वाढ झाली आहे. इयर टू डेट (YTD) महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर नोव्हेंबर महिन्यात ७.३% वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.नोव्हेंबर २०२५ मध्ये राज्यांमध्ये जीएसटी संकलनात संमिश्र कल दिसून आला. अनेक ईशान्येकडील राज्यांनी चांगली कामगिरी केली तर अनेक मोठ्या राज्यांनी घट नोंदवली.
कर संकलनात प्रमुख राज्यांमध्ये, महाराष्ट्र (३%), कर्नाटक (५%) आणि केरळ (७%) यांनी मध्यम वाढ नोंदवली असून गुजरात (-७%), तामिळनाडू (-४%), उत्तर प्रदेश (-७%), मध्यप्रदेश (-८%) आणि पश्चिम बंगाल (-३%) यांनी घट नोंदवली आहे. केंद्रशासित प्रदेशांनी विविध कामगिरी दाखवली, ज्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे ९% वाढली, तर लक्षद्वीपमध्ये ८५% घट झाली. तर छोट्या छोट्या राज्यात अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मेघालय आणि आसाममध्ये सकारात्मक वाढ नोंदवण्यात आली. अरुणाचलमध्ये ३३% ची मजबूत वाढ झाली. याउलट, मिझोरम (-४१%), सिक्कीम (-३५%) आणि लडाख (-२८%) मध्ये तीव्र घट दिसून आली आहे.






