Monday, December 1, 2025

Zatpat Trending Video : 'झटपट पटापट' लक्ष्मीजी घरके अंदर... OG दीपक रांगोळीवाला आणि डॅनी पंडितची 'भन्नाट' जुगलबंदी; व्हिडीओ तुफान व्हायरल

Zatpat Trending Video : 'झटपट पटापट' लक्ष्मीजी घरके अंदर... OG दीपक रांगोळीवाला आणि डॅनी पंडितची 'भन्नाट' जुगलबंदी; व्हिडीओ तुफान व्हायरल

मुंबई : सोशल मीडिया क्रिएटर डॅनी पंडित (Danny Pandit Reels) याचे रील्स व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. डॅनी पंडित हा सोशल मीडियावरील ओरिजनल व्हिडीओ कंटेंट क्रिएटर्सची नक्कल (Imitation) करून स्वतःचे विनोदी रील्स तयार करण्यासाठी ओळखला जातो. डॅनीने तयार केलेल्या व्हिडीओपैकी दीपक रांगोळीवाल्यांची नक्कल करणारा व्हिडीओ तुफान गाजला. डॅनीच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. २८ ऑक्टोबर रोजी केलेल्या या व्हिडीओची क्रेझ प्रेक्षकांमध्ये आजही कायम आहे. डॅनीच्या 'झटपट पटापट' ट्रेंडिंग व्हिडीओची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, त्यावर चक्क रिमिक्स गाणे (Remix Song) देखील तयार करण्यात आले आहे. डॅनीने या गाण्याचा टीझरही आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आहे. एवढेच नव्हे तर, डॅनी पंडितने ओरिजनल दीपक रांगोळीवाल्यांसोबतही एक रील तयार केले आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्ह्युज मिळाले असून, नेटकऱ्यांनी लाईक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. डॅनी पंडित सध्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.

OG दीपक रांगोळीवाल्यांचं सुपरहिट ठरलेलं जिंगल

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

टेंशन घ्यायचं नाही डान्स करत राहायचं सासूबाई चिडणार आहेत घाबरायचं नाही वाइप करत राहायचं नाही आणि सोबत म्हणायचं झटपट पटापट लक्ष्मीजी घरके अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी घरके पटापट पाटापुढे, ताटापुढे, देवापुढे मागेपुढे सगळीकडे चहुकडे आम्ही खातो बटाटवडे...

ओरिजनल रांगोळीवाला आणि डॅनी पंडितचे 'अनपेक्षित कोलॅब' तुफान गाजले

सोशल मीडिया क्रिएटर डॅनी पंडित याने दीपक रांगोळीवाल्यासोबत तयार केलेला नवा रील व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान गाजत आहे. डॅनी पंडितच्या चाहत्यांनी यापूर्वीच त्याला ओरिजनल क्रिएटरसोबत रील करण्याची मागणी केली होती आणि अखेर नेटकऱ्यांची ही प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. या 'कोलॅब' व्हिडीओने चाहत्यांना मोठा आनंद दिला असून, त्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेक नेटकऱ्यांनी फायर आणि हार्ट इमोजी शेअर करत आपला उत्साह व्यक्त केला आहे. aran_shetty_7 नावाच्या एका युजरने या व्हिडीओचे कौतुक करताना म्हटले आहे की, "एकदम भन्नाट! माझं आजपर्यंतचा आवडतं कोलॅब..." तर akasheyess नावाच्या युजरने याला २०२५ मधील अनपेक्षित घटना संबोधले. त्याने लिहिले की, "दीपक X डॅनी! २०२५मधील पूर्णतः अनपेक्षित कोलॅब..." डॅनी पंडितच्या नक्कल करणाऱ्या रील्सला ओरिजनल क्रिएटरची साथ मिळाल्याने या व्हिडीओला सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळाली आहे.

Comments
Add Comment