Thursday, January 15, 2026

Bharti Singh Maternity Photoshoot .... भारती सिंगचा मॅटर्निटी बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट

Bharti Singh Maternity Photoshoot .... भारती सिंगचा मॅटर्निटी बेबी बम्प फ्लॉन्ट करत फोटोशूट

मुंबई : टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंग दुसऱ्यांदा आई होण्याच्या तयारीत आहे. दुसऱ्या प्रेग्नन्सीबद्दल भारती स्वतःही खूप उत्सुक असून तिने नुकतेच केलेले मॅटर्निटी फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सुंदर निळ्या गाऊनमध्ये बेबी बंप फ्लॉन्ट करताना भारती अत्यंत मोहक दिसत असून तिच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नन्सी ग्लो स्पष्टपणे जाणवत आहे.

फोटोशूटमध्ये भारतीने निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला असून त्यावर पांढरी फुलांनी सजलेले आकाशी रंगाचे नेटचे जॅकेट घातले आहे. हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले – “दुसरा बेबी लिंबाचिया लवकरच येत आहे.” भारतीचे फोटो समोर येताच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. काही चाहत्यांनी बेबी बंप पाहून “मुलगा होईल की मुलगी?” याचे अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे.

दुसरी मुलगी हवी - भारतीची इच्छा

भारतीने आधीच अनेक मुलाखतीत आणि तिच्या व्लॉगमध्ये सांगितले आहे की, तिला दुसरी मुलगी हवी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशीही तिने बाप्पाकडे मुलीसाठीच प्रार्थना केली होती. त्यामुळे काही चाहत्यांचा विश्वास आहे की, यावेळी भारतीला मुलगीच होईल. तर काहींचे म्हणणे आहे की मुलगा होण्याची शक्यता जास्त आहे. भारती आणि हर्ष लिंबाचिया यांचा पहिला मुलगा ‘गोला’ आधीच सोशल मीडियावर आणि पापाराझींमध्ये खूप लोकप्रिय आहे.

सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

भारतीच्या मॅटर्निटी फोटोशूटवर जस्मिन भसीन, रुबिना दिलैक, मोनालिसा, दिव्यांका त्रिपाठी, अली गोनी यांसह अनेक कलाकारांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी तिच्या बेबी शॉवरचे फोटोही समोर आले होते, ज्यात तेजस्वी प्रकाश, जन्नत जुबैर, कृष्णा अभिषेक, अली अशा अनेक टीव्ही स्टार्सनी हजेरी लावली होती.

भारतीच्या या मॅटर्निटी शूटमुळे चाहत्यांमध्ये दुसऱ्या बाळाच्या आगमनाची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >