Monday, December 1, 2025

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

महापरिनिर्वाण दिनानिमित्त १२ अतिरिक्त उपनगरी गाड्या

मुंबई (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन २०२५ निमित्त प्रवाशांच्या सुविधेसाठी ५ आणि ६ डिसेंबर (शुक्रवार – शनिवार)च्या मध्यरात्री परळ– कल्याण आणि कुर्ला – वाशी/पनवेल दरम्यान मध्य रेल्वे १२ अतिरिक्त उपनगरी विशेष गाड्या चालवणार आहे. या उपनगरी विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबा देतील.

  1. मुख्य मार्ग – अप विशेष गाड्या (कल्याण/ठाणे/कुर्ला– परळ मार्ग)
  2. मुख्य मार्ग – डाउन विशेष गाड्या (परळ - कुर्ला/ठाणे/कल्याण मार्ग)
  3. हार्बर मार्ग – अप विशेष गाड्या (पनवेल/वाशी – कुर्ला मार्ग)
  4. हार्बर मार्ग – डाउन विशेष गाड्या (कुर्ला– वाशी/पनवेल मार्ग)

    अशा विशेष गाड्या चालवल्या जाणार असून सर्व संबंधितांनी याची कृपया नोंद घ्यावी व या सुविधेचा लाभ घ्यावा. प्रवाशांना गैरसोयी टाळण्यासाठी योग्य व वैध तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन करीत आहे.

Comments
Add Comment