विचारधारा

जीवनगंध : पूनम राणे


सोमपूर नावाचे एक शहर होते. शहरांमध्ये विपुल सोयी-सुविधा होत्या. नयनरम्य वातावरण होतं. मात्र शाळा शहरापासून थोडी लांबच होती. शाळेत जाणाऱ्या मुलांना एक तर स्वतंत्र वाहन करून जावे लागत होते, तर काही पालक स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडत होते.


त्या शहरात सुहास त्याची पत्नी शर्मिला तसेच सूरज व प्रथा या आपल्या दोन मुलांसोबत राहत होता. प्रथा इयत्ता नववीमध्ये शिकत होती. सूरज पाचवीमध्ये शिकत होता. सुहास आणि शर्मिला नामांकित शाळांमध्ये शिक्षक या पदावर नोकरी करत होते. दोघांची शाळा दोन्ही अधिवेशनामध्ये भरत होती. त्यामुळे सूरजला शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी सुहासकडे होती.


सुहास शाळा सुटल्यानंतर आपल्या दोन चाकी वाहनावरून सूरजला घेऊन घरी येत असे. शाळा सुटताच धावत जाऊन सूरज आपल्या पप्पांना बिलगायचा आणि सकाळपासून वर्गात ज्या-ज्या गोष्टी घडल्या, टीचरने जे जे शिकवले ते तो आपल्या पप्पांना सांगायचा.


शाळा सुटली तसा सूरज धावतच जाऊन आपल्या पप्पांना बिलगला. स्कूटरवर त्यांच्या पाठीमागे जाऊन बसला. शाळेत घडलेल्या गमतीदार घटना तो पप्पांना सांगू लागला. पप्पाही तल्लीन होऊन ऐकू लागले. आज मात्र वर्गात घडलेली गोष्ट वेगळीच होती. त्यामुळे पप्पा ऐकण्यात दंग झाले होते. रस्त्यावरचा सिग्नल तोडून त्यांनी आपली गाडी क्रॉस केली होती. याकडे त्यांचं लक्षच नव्हते.


सूरज जोरात ओरडून म्हणाला, “पप्पा... अहो पप्पा... तुम्ही सिग्नल तोडलाय!” त्यावर पप्पा म्हणाले ,“अरे, पण आपल्याला कोणी पाहिलं तर नाही ना.” आपल्याला कोणीही पाहिलं नाही.


पुढच्या सिग्नलवर काही अंतरावर सुहासला ट्रॅफिक हवालदार दिसले.सुहासने गाडी थांबवली व म्हणाले ,“माझ्या हातून चूक झाली आहे. मी सिग्नल तोडला आहे. मी सिग्नल तोडून पुढे आलो आहे. कृपया माझ्याकडून आपण दंड वसूल करावा.”


ट्रॅफिक हवालदार म्हणाले, “अहो, पण तुम्हाला कोणी पाहिलं नाही ना?” “तसं नाही हो.” मला पाहिले. पाठीमागे पाहून सुहास म्हणाला.
“कोणी?” हवालदाराने विचारले.
“माझ्या मुलाने पाहिले.”
ट्रॅफिक हवालदारने सुहासला पावती दिली.
सुहासने त्यांचे आभार मानले व म्हणाला ,“जर मी आज ही पावती फाडली नसती तर मी फार अपराधी ठरलो असतो.”


मी सूरजच्या माध्यमातून आयुष्य घडवत आहे. अर्थात राष्ट्र घडवत आहे. माझ्या या वागण्याचा माझ्या सूरजच्या मनावर विपरीत परिणाम झाला असता. आपली मुलं आपले निरीक्षण करत असतात. त्यातून त्यांची विचारधारा तयार होत असते. बऱ्याच वेळेला आपल्या मनात नसतानाही अशा प्रकारच्या चुका अचानक आपल्या हातून घडतात; परंतु वेळीच सावरल्या तर पुढे होणाऱ्या धोक्यापासून आपण सहज वाचू शकतो. ट्रॅफिक हवालदार काकांना सुहासचे कौतुक वाटले आणि ते म्हणाले,“आपणासारखे पालक सर्व मुलांना लाभले, तर हे राष्ट्र घडायला वेळ लागणार नाही.”


यावर सूरज म्हणाला,“पप्पा आज आमच्या शाळेमध्ये बीपीसीएलचे अधिकारी आले होते. त्यांनी आज आम्हा मुलांना रस्तासुरक्षा व वाहनसुरक्षा याविषयी प्रात्यक्षिकासह माहिती दिली होती. तसेच या विषयावर आमच्या शाळेत चित्रकला स्पर्धा व निबंधस्पर्धा वकृत्व स्पर्धांचे आयोजन पुढील आठवड्यात करणार आहेत. तेव्हा मी वकृत्व स्पर्धेत भाग घेऊन आज झालेला प्रसंग सांगणार आहे.


शेवटी सुहास व सूरजने ट्रॅफिक हवालदार काकांना नमस्कार करून दोघांनी आपल्या घरचा रस्ता धरला आणि घरी येऊन घडलेला वृत्तांत आपल्या पत्नीला सांगितला. शर्मिला मॅडमना या गोष्टीचे फार कौतुक वाटले.


तात्पर्य :- अनावधानाने घडलेल्या गोष्टी वेळीच सावरल्या पाहिजेत

Comments
Add Comment

सौभरी ऋषींची कथा

महाभारतातील मोतीकण; भालचंद्र ठोंबरे श्रीमद्भागवत पुराण व विष्णुपुराणानुसार एकदा मनूला शिंका आली, त्यातून एक

आठवणीतला शिमगा

स्मृतिगंध; लता गुठे मी वयाच्या १७ व्या वर्षी मुंबईत आले आणि या सिमेंटच्या जंगलात माझी कर्मभूमी निर्माण केली. पण

बागों मे जबजब फूल खिलेंगे...

नॉस्टॅल्जिया; श्रीनिवास बेलसरे कर्णमधुर संगीत, आपल्या कलेशी समरस झालेले गायक, अर्थपूर्ण हृदयस्पर्शी गाणी,

कोवळ्या मनांच्या संवेदना ...

स्पंदन; अश्विनी शिंदे - भोईर आजूबाजूला घडणाऱ्या असंख्य घटनांची अनेक स्पंदनं मनात उमटत असतात. एखादं दृश्य

Women Day 2026 : कळी उमलू लागलीये...

मनोगत; साक्षी माने ‘स्त्री’ हा शब्द उच्चारला की डोळ्यांसमोर उभी राहते ती, तिची अष्टपैलू रूपं आणि तिच्या

Women Day 2026 : सामंजस्य हरवतेय!

निरीक्षण; डॉ. गौरी कानिटकर महात्मा फुले, आगरकर प्रभुतींनी मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. मुलगी शिकली की घर