दहा नगरपालिका हद्दीत मद्यविक्रीला ३ दिवस बंदी

नगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर प्रशासनाचे निर्देश


अलिबाग : निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी, तसेच संबंधित नगर परिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी १ ते ३ डिसेंबर २०२५ रोजी या तीन दिवशी रायगड जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित नगर परिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी/विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


रायगड जिल्ह्यातील खोपोली, अलिबाग, मुरूड-जंजिरा, पेण, उरण, कर्जत, माथेरान, रोहा, श्रीवर्धन व महाड या नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकींसाठी २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा/नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी तिन्ही दिवशी रायगड जिल्ह्यात निवडणूक होणाऱ्या संबंधित नगर परिषदा, नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी, विदेशी किरकोळ मद्य व माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस मद्य विक्रीस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ कलम ५४ व ५६ मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येणार आहे. १ ते ३ डिसेंबर या िदवशी जिल्ह्यातील निवडणुकांचे वातावरण संवेदनशिल असल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणू ही काळजी घेण्यात आली.

Comments
Add Comment

जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच अग्रभागी

तीन नगराध्यक्षांसह ७० नगरसेवक विजयी; दुसऱ्या स्थानावर शिंदेगट शिवसेना अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दहा नगर

युवा मतदाराने दिग्गजांना केले पराभूत

घोडेबाजार महायुतीसाठी ठरला निर्णायक माथेरान निवडणून चित्र मुकुंद रांजाणे माथेरान : शिवसेना-भाजप महायुतीच्या

महाडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपने रचला इतिहास

फटाके फोडून, गुलाल उधळण्याची संधी तिघांनाही महाड निवडणूक चित्र संजय भुवड महाड : नगर परिषदेची २०२५ ची निवडणूक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान वाहतूक सुरू, पहिल्या विमानाचं जोरदार स्वागत

पनवेल : रायगड जिल्ह्यात असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून (गुरुवार २५ डिसेंबर २०२५)

सिडको-नैना क्षेत्रातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन

पनवेल तालुक्यातील ४६ गावांचा प्रश्न मार्गी लागणार पनवेल : पनवेल तालुक्यामधील सिडको व नैना अधिसूचित क्षेत्रातील

कर्जतमध्ये सुधाकर घारे यांचे जोरदार कमबॅक

नितीन सावंतांना सोबत घेऊन थोरवे आणि लाड यांना धक्का कर्जत : येथील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत परिवर्तन विकास