भारतीय श्रीमंतीचे ‘कोटक लक्झरी इंडेक्स’मधून नवे खुलासे

मुंबई : भारतातील अतिश्रीमंत वर्ग कोणत्या गोष्टींवर, कशा प्रकारे आणि किती प्रमाणात खर्च करतो, याचा सखोल मागोवा घेणारा देशातील पहिलावहिला कोटक प्रायव्हेट उंची निर्देशांक जाहीर झाला आहे. कोटक प्रायव्हेट या बँकेने उंची जीवनशैलीशी निगडित १२ प्रमुख क्षेत्रांतील किमतीतील बदलांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला असून एका अग्रगण्य आर्थिक संस्थेचे तज्ज्ञ मार्गदर्शन यामागे आहे.


भारतातील उंची बाजारपेठ २०३० पर्यंत तब्बल साडेऐंशी अब्ज डॉलर्सपर्यंत झेपावण्याची शक्यता व्यक्त होत असताना हा निर्देशांक भारतीय उच्चभ्रू जीवनातील बदलते प्राधान्यक्रम स्पष्टपणे समोर आणतो.


कोटक प्रायव्हेटच्या प्रमुख ओइशर्या दास म्हणाल्या की, “उंची जीवनशैली म्हणजे केवळ महाग वस्तूंची मालकी नव्हे; वैयक्तिक आवडी, अनन्यता, गुणवत्तेचा वारसा आणि सजगतेने जगणे हे त्याचे खरे घटक आहेत. आम्हाला मिळालेला आर्थिक विशेषज्ज्ञचा वारसा व मालमत्तेच्याविषयीचे सखोल ज्ञान यांचा लाभ घेत, या अहवालाची ही उद्घाटनपर आवृत्ती सर्वसमावेशक मापदंड पुरविते.


निर्देशांकातील प्रमुख निष्कर्ष




  1. २०२२ ते २०२५ : तब्बल २२ टक्क्यांची उसळी
    वार्षिक सरासरी ६.७ टक्के वाढ; आलिशान घरे आणि उंची पिशव्या यांनी तर शेअर निर्देशांकांनाही मागे टाकले.

  2. स्वास्थ्य — प्रतिष्ठेचे नवे मानक
    दीर्घायुष्य, तणावमुक्त जीवन, मानसिक संतुलन यावर अधिक खर्च; या विभागात १४ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ.
    मालकीपेक्षा अनुभवांचे पारडे जड
    जगभ्रमण, उंची भोजन, दुर्मीळ स्थळांची सफर यावर खर्चात ११ टक्क्यांची झेप; “जगा आणि कहाणी समृद्ध करा” हा दृष्टिकोन बळावतो.

  3. निवासस्थान म्हणजे नवे ओळखीचे प्रतीक
    आधुनिक तंत्रसज्ज, दर्जेदार घरांच्या किमतीत १० टक्के वाढ कायम.

  4. फॅशनची लोकप्रियता टिकून
    उंची पिशव्यांमध्ये वाढ; परंतु घड्याळे आणि दारू यांची घसरण—श्रीमंतीचे स्वरूप बदलते याचे द्योतक.

  5. उच्च शिक्षणावर वाढता खर्च
    विदेशी विद्यापीठे व विशेष अभ्यासक्रमांसाठी खर्चात ८ टक्क्यांची वाढ; “शिक्षण म्हणजे वारसा” ही भावना दृढ.


भारतातील नव्या श्रीमंतीचे सूत्र


संपत्तीपेक्षा अनुभव
मालकीपेक्षा ओळख आणि वारसा
स्वास्थ्य आणि मानसिक समृद्धीला उच्च स्थान
प्रतिष्ठा आणि गुंतवणुकीचा संगम

Comments
Add Comment

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ४२ जागांसाठी निवडणूक; ११६ जणांची माघार, ११५ उमेदवार रिंगणात जिल्ह्यातील ८ पंचायत

सांताक्रूझ ते चेंबूर- लिंक रोड कनेक्टरचे काम दोन महिन्यात होणार

मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्सप्रेस हायवे) आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यान

मुंबई महापालिकेत पक्ष कार्यालयासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांची कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होवून

महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत डॉ. भूषण गगराणी राहणार पिठासीन अधिकारी

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी यापूर्वी पिठासीन अधिकारी म्हणून

'आनंद दिघेंचे स्वप्न पूर्ण करत आहोत, ठाणे महापालिकेवर भगवा कायम फडकत राहील'

ठाणे : आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ठाण्यातील त्यांच्या समाधीस्थळी