Wednesday, January 14, 2026

भारताला ‘दितवाह’चा धोका

भारताला ‘दितवाह’चा धोका

तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुद्दुचेरीला सतर्कतेचा इशारा

श्रीलंकेत ४६ बळी

नवी दिल्ली : श्रीलंकेमध्ये मोठी हानी केल्यानंतर ‘दितवाह’ नावाचे भयानक चक्रीवादळ आता भारताच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पुद्दुचेरीसह काही राज्यांसाठी ‘प्री-सायक्लोन’ अलर्ट जारी केला आहे.

श्रीलंकेत ‘दितवाह’ने मोठे नुकसान केले आहे. या वादळामुळे आतापर्यंत ४६ लोकांचा मृत्यू झाला असून, २३ जण बेपत्ता आहेत. गेल्या २४ तासांत ३०० मिमी पेक्षा जास्त मुसळधार पाऊस झाला आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या, पुराच्या घटना घडल्या आहेत. ४३,९९१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. श्रीलंकेतील शाळा बंद करण्यात आल्या, रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे, तर कोलंबो स्टॉक एक्स्चेंजमधील व्यवहारही लवकर थांबवावे लागले आहेत. वित्तहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >