'तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक आमचेच आहेत'

अंबरनाथ : 'तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत, निधी मी देतो त्यामुळे घड्याळाला मतदान करा' असे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका प्रचारसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार म्हणाले होते. या वक्तव्याचा समाचार भाजपच्या चंद्रकांत पाटील यांनी अलिकडेच घेतला. आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही अजित पवारांना सुनावले आहे. तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे असल्या तरी मालक आमचेच आहेत, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर एका प्रचारसभेत म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे झालेल्या एका प्रचार सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.


याआधी भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही अजित पवारांना कडक शब्दात सुनावले होते. तिजोरीच्या चाव्या जरी तुमच्याकडे असतील तरी तिजोरीचे मालक आमचे आहेत असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तर तिजोरी जरी तुमच्याकडे असली, त्याच्या चाव्या जरी तुमच्याकडे असल्या तरी , तिजोरी ज्या खोलीत आहे आणि तुम्ही ज्या खोलीत राहता त्या खोलीचे मालक आमचे आहेत; असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर अंबरनाथ येथे झालेल्या एका प्रचार सभेत म्हणाले.


पडळकरांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. ज्या डोळ्यांवर दोन लाखाचा चष्मा, ज्यांच्या पायात पन्नास हजाराची सँडल, ज्यांच्या काखेत दीड लाखाची पर्स आणि जे मरिन ड्राईव्हवर हजार रुपयांचा चहा पितात अशा बहिणींसाठी लाडकी बहीण योजना नाही. ज्या बहिणीला पन्नास रुपये देखील खर्च करायला नसतात त्या बहिणी करता लाडकी बहीण योजना आहे, असे भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले. हे वक्तव्य करताना त्यांनी थेट कोणाचेही नाव घेणे टाळले.

Comments
Add Comment

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

कल्याण डोंबिवली मनपा निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी पॅनल क्र. 1 : बीजेपी - वरुण पाटील ( विजयी ) शिवसेना -

“महायुतीचा धडाका: मुंबईत महापौर आमचाच!

विकासाच्या अजेंड्यावर जनतेची मोहोर मुंबईकरांनी अन्य ब्रँडला नाकारले - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे” ठाणे

X अर्थात Twitter बंद पडलं, युझर त्रस्त

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) जो आधी ट्विटर (Twitter) या नावाने ओळखला जात होता तो शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी

मुंबईकरांच्या सेवेचे नवे पर्व

दोन्ही ठाकरेंपेक्षा एकट्या भाजपला अधिक जागा मुंबई - मुंबईत दोन्ही ठाकरेंच्या एकुण जागांपेक्षा एकट्या भाजपाला

BMC Election 2026 : मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी

मुंबई महापालिका निवडणूक २०२६, विजयी उमेदवारांची यादी प्रभाग १ - रेखा राम यादव, शिवसेना प्रभाग २ - तेजस्वी

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई : ज्या काँग्रेसपायी उबाठाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत त्यांना ७