Thursday, January 15, 2026

एसी लोकलचा बनावट पास बनविणाऱ्या दाम्पत्याला अटक

एसी लोकलचा बनावट पास बनविणाऱ्या दाम्पत्याला अटक

कल्याण : आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून रेल्वे पास बनविणाऱ्या अंबरनाथमधील एका उच्चशिक्षित दांपत्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ओमकार शर्मा व गुडिया शर्मा असे पती-पत्नीचे नाव आहे. ओमकार इंजिनिअर आहे, तर गुडिया बँकेमध्ये सेल्स मॅनेजर आहेत.

कल्याण स्थानकातील एसी लोकलमधील तपासणीदरम्यान ही घटना उघड झाली. गुडिया हिला तिकीट तपासणीदरम्यान विशाल नवले या टीसीने पास दाखविण्यास सांगितले. तिने रेल्वेच्या यूटीएस ॲपमधील स्क्रीन दाखवली. मात्र तो पास संशयास्पद वाटल्याने टीसीने तत्काळ रेल्वे हेल्पलाईनवर कॉल करून त्या पासची पडताळणी केली. तपासात सदर पास ओम शर्मा या व्यक्तीचा असून, तो जानेवारी महिन्यात दिला होता. पास फेब्रुवारीमध्येच कालबाह्य झालेला होता. गुडिया शर्मा असे नाव सांगितल्याने टीसीचा संशय अधिक गडद झाला. डोंबिवली स्थानकात तिला उतरवून आरपीएफ कार्यालयात चौकशी करण्यात आली. तेव्हा खुलासा झाला. तिच्या पतीने स्वतःच्या एसी लोकल पासवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एडिट करून त्यावर पत्नीचे नाव व तपशील टाकत बनावट पास तयार केल्याचे मान्य केले. दोघांवर रेल्वे पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा