कणकवली बाजारपेठेत भाजपची प्रचार रॅली

कणकवली : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि १७ नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कणकवली बाजारपेठेत प्रचार रॅली काढण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पटकी देवी ते पटवर्धन चौक अशी उत्साहात प्रचार रॅली झाली. या रॅलीला जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक मान्यवरांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. घोषणा आणि पक्षाच्या घोषणांनी वातावरणात उत्साह संचारला होता. भाजपने कणकवली शहरातून पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी प्रचार रॅली काढली. भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नितेश राणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, समीर नलावडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारत माताकी जय अशी घोषणाबाजी करत रॅलीत सहभागी झालेल्यांनी परिसर दणाणून सोडला. भाजपच्या प्रचार रॅलीत कार्यकर्ते आणि नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.





पटकीदेवी येथून रॅलीला शुभारंभ झाला. रॅलीत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १७ मधील राष्टÑवादीचे उमेदवार अबिद नाईक, माजी उपनगराध्यक्ष व प्रभाग क्रमांक १३ चे उमेदवार बंडू हर्णे, भाजपचे कणकवली विधासभा मतदारसंघ प्रमुख मनोज रावराणे, तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, मिलिंद मेस्त्री, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, उमेदवार राकेश राणे, प्रतीक्षा सावंत, स्वप्नील राणे, माधवी मुरकर, मेघा गांगण, सावी मुंज, सुप्रिया नलावडे, गौतम खुडकर, आर्या राणे, मेघा सावंत, मयुरी चव्हाण, मनस्वी ठाणेकर, अण्णा कोदे, विश्वजित रासम, संजय कामतेकर, राजश्री धुमाळे, विशाल कामत, राजू गवाणकर, भरत उबाळे, संदीप नलावडे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पटकी देवी येथून सुरू झालेल्या रॅलीची आप्पासाहेब पटवर्धन चौक सांगता झाली. रॅली दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यापारी व नागरिकांची संवाद साधला.

Comments
Add Comment

Jannat Zubair Attack: अभिनेत्री जन्नत झुबैरसह भाऊ आयानवर हल्ला, दोघे जखमी; चाहत्यांना धक्का

मुंबई: टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार जन्नत झुबैर रहमानी आणि तिचा भाऊ अयान झुबैर रहमानीवर हल्ला

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे

'महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक' विधानसभेत मंजूर 

मुंबई : राज्यातील बेकायदेशीर धर्मांतरणाला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने मांडलेले ऐतिहासिक ‘महाराष्ट्र

दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची बैठक

नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबईच्या विकासाकडे नाही तर दिवा,घड्याळ, साडी, फणी, वेणीकडे लक्ष; महापौरांनी शेलक्या शब्दांत घेतला विरोधी पक्षनेत्यांचा समाचार

मुंबई: महापौरांच्या गाडीवर बसवण्यात आलेल्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या मुद्यावर विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या

शिवछत्रपतींविषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांचे निलंबन करा; मंत्री नितेश राणे विधानसभेत कडाडले

मुंबई: अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विधानसभेत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आमदार