New Mini Compactor : महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या ताफ्यात ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर!

कचरा अधिक वाहून नेण्याची क्षमता


कॉम्पॅक्टर लवकर खराब न होण्यासाठी केली वेगळी सुधारणा


भविष्यात कचरा गाड्यांचे रंग बदलले जाणार


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबईतील स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यात ३० नवीन मिनी कॉम्पॅक्टर वाहनांची भर पडली आहे. यापूर्वीच्या मिनी कॉम्पॅक्टरच्या तुलनेत नव्या वाहनांना एका फेरीत दुप्पट कचरा वाहून नेण्याची क्षमता आहे. ही वाहने एका सत्रात दोन फेऱ्या करणार आहेत. विशेष म्हणजे या कॉम्पॅक्टरचे आयुष्यमान वाढवण्यासाठी त्यामध्ये मोठ्याप्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे. तसेच आजवर कचरा गाड्यांचा रंग हिरवा दिसत असला तरी भविष्यात आपल्याला या गाड्या निळ्या तसेच पांढऱ्या रंगाच्या दिसून येणार आहे



मुंबईतील कचरा वहनाची मोठी प्रक्रिया लक्षात घेऊन आवश्यक सुधारणा करून अद्ययावत वाहने उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिल्या होत्या. याआधीच्या वाहनांमध्ये भेडसावणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून परिवहन अभियांत्रिकी विभागाने केलेल्या कल्पक सुधारणा कौतुकास्पद असल्याचे गगराणी यांनी नमूद केले आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य आसनव्यवस्था, ओला व सुका कचरा यांसाठी स्वतंत्र कप्पे, तसेच दीर्घकाळ टिकणाऱ्या साधनसामुग्रीचा वापर यांमुळे मिनी कॉम्पॅक्टरचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार असल्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी सांगितले. या सुधारणा मुंबईच्या पर्यावरण संवर्धनासाठीही उपयुक्त ठरतील, असेही त्यांनी नमूद केले.


कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये, कचऱ्यातून निघणाऱ्या द्रव्यामुळे (लिचेट) धातुपत्रा सतत खराब होत असल्याचे आढळून येत होते. नव्या वाहनांमध्ये ५ मिमी जाडीच्या ‘हार्डॉक्स’ स्टील मटेरियलचे फ्लोरिंग वापरले आहे. परिणामी वाहनाचे आयुष्यमान वाढण्यास मदत होणार आहे. तसेच हायड्रॉलिक पद्धतीच्या क्लोजिंग प्लेट कव्हरमुळे वाहनाची मागील बाजू पूर्णपणे बंदिस्त राहून कचरा वाहतुकीचे स्वरूप सुधारले आहे.



वाहनांसाठी पांढऱ्या - निळ्या रंगाची रंगसंगती


मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यातील सर्व वाहनांचे रंग येत्या काळात पांढरा आणि निळा अशा रंगसंगतीत बदलण्याचा प्रशासनाचा मानस आहे. ही प्रक्रिया टप्पेनिहाय पद्धतीने पार पाडली जाईल, अशी माहिती उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांनी दिली. आगामी कालावधीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ताफ्यातील सर्व वाहने ही नव्या रंगसंगतीनुसार रंगवण्यात येणार आहेत.



मिनी कॉम्पॅक्टरची वैशिष्ट्ये :


इंजिन क्षमता : ११५ अश्वशक्ती


एकाच फेरीत कचरा वाहून नेण्याची क्षमता : ५ टन - त्यामुळे अधिक कचरा वहन शक्य


क्षमता : ९ घनमीटर - कचरा सामावण्याची अधिक क्षमता


कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र ४ आसनी व्यवस्था

Comments
Add Comment

काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यासही भाजपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काँग्रेसचे माजी नगरसेवक धर्मेश व्यास यांनीही अखेर भाजपच्या झेंडा हाती घेतला. धर्मेश

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आरोग्य आपल्या दारी’ उपक्रम राबवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवक व नगराध्यक्षांचा सत्कार मुंबई : “मुख्यमंत्रीपदी

शिरोडा-वेळाघरमध्ये होणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंचतारांकीत हॉटेल

पालकमंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश; ताज समूहासोबत लवकरच सामंजस्य करार मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील

प्रकाश आणि शिक्षणाने उजळलेला एक खास दिवस

मुंबई : मुंबईतील विविध भागांतील ६८० हून अधिक मुलांनी रिलायन्स फाउंडेशनच्या वार्षिक एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर

खरीप हंगाम २०२४–२५;मका,ज्वारी सह भरड धान्य खरेदीसाठी शेतकरी नोंदणीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई : खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान व मका, ज्वारी, रागीसह भरड धान्य

वर्दीला काळिमा! मुंबई सेन्ट्रलमध्ये पोलिसांचे गतिमंद मुलीशी अश्लील चाळे

मुंबई : मुंबई सेंट्रल परिसरात वर्दीतील पोलिसानेच एका गतिमंद तरुणीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना