मोहित सोमण:रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर ५२ आठवड्यातील उच्चांकावर (All time High) पोहोचला आहे. प्रामुख्याने शेअर दोन कारणांमुळे आज चर्चत राहिला आहे. दिवसभरात शेअर मोठ्या प्रमाणात तेजीत राहिला. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने डिजिटल रिअल्टी, ब्रुकफिल्ड असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या दोन कंपन्यांशी हातमिळवणी करत डिजिटल कनेक्शियन (Digital Connexion) नावाच्या डेटा सेंटर प्रकल्पाची घोषणा केली आहे. आर्थिक वर्ष २०३० पर्यंत भारतातील ए आय (Artificial Intelligence) डेटा सेंटरमध्ये अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे समुहाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हा करार दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर उघडण्यात येणार आहेत. माहितीप्रमाणे, मोठ्या प्रमाणात या प्रकल्पात गुंतवणूक करण्यात येईल. विशाखापट्टणम येथील ४०० एकर परिसरात १ गिगावॉट इतका भव्य प्रकल्प हा असणार आहे. डिजिटल कनेक्शियन कंपनीने डिजिटल कनेक्शनने बुधवारी एका प्रेस निवेदनात म्हटले आहे की, ' कंपनी दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे ४०० एकर (१.६१८७ चौरस किलोमीटर) पसरलेल्या सुविधेत कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित मूळ डेटा सेंटर्सचा १ गिगावॅटचा भव्य कॅम्पस बांधणार आहे. त्यांनी आंध्र प्रदेश आर्थिक विकास मंडळासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.'
याखेरीज जेफरीज या ब्रोकरेज कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजमधील डिजिटल सर्विसेस, एनर्जी, रिटेल या क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दुप्पटीने वाढ होऊ शकते असे म्हटल्यावर गुंतवणूकदारांनीही रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला मोठा प्रतिसाद दिला आहे. रिस्क टू रिवार्ड या गुणोत्तरात कंपनी चांगली कामगिरी करत असून सणासुदीच्या काळात वाढलेली मोठी मागणी, वाढलेल्या विक्रीसह वाढलेले मार्जिन, अपेक्षित महसूल वाढ या कारणामुळे शेअर्समध्ये अपसाईड वाढ दर्शविली गेल्याने शेअर आज मोठ्या प्रमाणात उसळला होता. ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिल्याने १५८०.९० रूपये प्रति शेअरवर उसळला होता. ब्रोकरेज कंपनीने १७८५ रूपये प्रति शेअरची लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली होती. त्यामुळे सध्याच्या मूळ किमतीपेक्षा १४% अपसाईडवर (वरच्या पातळीला) शेअर वाढणे अपेक्षित आहे.
ब्रोकरेज मते, कंपनीच्या एफएमसीजी क्षेत्रीय कंपनीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सलग गेल्या सहा तिमाहीत कंपनीची वाढ १००% झाल्याने त्यांचा महसूल २.४ अब्ज डॉलरवर पोहोचला होता. याशिवाय रिलायन्सने नुकतीच डेटा सेंटरची घोषणा केल्याने जागतिक ए आय तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत उतरण्याचे कंपनीने ठरवले आहे. जागतिक पातळीवर मोठ्या कंपन्या अभूतपूर्व एआय शर्यतीत टिकून राहण्याचा प्रयत्न करत असताना डेटा सेंटरच्या बांधकामात ट्रिलियन डॉलर्सचा ओघ वाढत आहे. अल्फाबेट इंक कंपनी आंध्र प्रदेश देखील एक प्रमुख ठिकाण म्हणून उदयास येत आहे. गुगलने गेल्या महिन्यात विशाखापट्टणममध्ये एआय इन्फ्रास्ट्रक्चर हब बांधण्यासाठी सुमारे $१५ अब्ज गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली होती. याशिवाय अमेझॉन कंपनीने आर्थिक वर्ष २०३० पर्यंत भारतात क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी १२.७ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, तर चाट जीपीटी (ChatGPT) OpenAI कंपनीने १ गिगावॅट डेटा सेंटर उभारण्याचा प्रयत्न करत आहे अशी माहिती प्रसारमाध्यमांनी यापूर्वी दिली होती. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने गेल्या आठवड्यात TPG Inc. कडून १ अब्ज डॉलर्स मिळवले होते. विश्लेषकांचे म्हणणे आहे की, डीमार्ट आणि भारती एअरटेल तुलनेत आरआयएल अर्थपूर्ण सवलतीवर व्यवहार करत आहे.