Friday, November 28, 2025

आताची सर्वात मोठी बातमी: गेल्या सहा तिमाहीतील जीडीपीत रेकॉर्डब्रेक वाढ! शेतीला मागे सारून 'या' क्षेत्राचे सर्वाधिक योगदान

आताची सर्वात मोठी बातमी: गेल्या सहा तिमाहीतील जीडीपीत रेकॉर्डब्रेक वाढ! शेतीला मागे सारून 'या' क्षेत्राचे सर्वाधिक योगदान

मोहित सोमण: काही क्षणापूर्वी सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने (MoSPI) दुसऱ्या तिमाहीची जीडीपी व इतर सांख्यिकी आकडेवारी जाहीर केली आहे. चकित करणाऱ्या अभ्यासातील माहितीप्रमाणे बहुप्रतिक्षित सकल देशांतर्गत उत्पादन (Gross Domestic Product GDP) रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली आहे. कारण यंदाच्या दुसऱ्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर तगड्या ८.२% संख्येने जीडीपी वाढला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीत हा दर ५.६% होता. विशेषतः वाढलेल्या जीडीपीत सर्वाधिक योगदान शेतीच्या तुलनेत उत्पादन व दुय्यम क्षेत्राची दिसली आहे. जीडीपीत हा गेल्या सहा तिमाहीतील सर्वाधिक प्रमाणात वाढलेला हा दर असून देशाची नाममात्र वाढ (Nominal Growth) इयर ऑन इयर बेसिसवर दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) ८.७% वाढली आहे. वास्तविक जीडीपी (Real GDP) दर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५.६% तुलनेत यंदा ८.२% वाढला असल्याचे सरकारने आपल्या निवेदनात म्हटले आहे. याच वास्तविक दराचे प्रमाण यंदाच्या पहिल्या तिमाहीत (Q1) ८.०% होते. विशेषतः क्षेत्रीय पातळीवर पाहिल्यास वास्तविक जीवीए (Gross Value Added GVA) इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) गेल्या वर्षीच्या ४४.९४ लाखकोटींच्या तुलनेत या तिमाहीत ४८.६३ लाख कोटीवर वाढले आहे असे सांख्यिकी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. माहितीनुसार, जीवीएतील नाममात्र वाढदर (Nominal GVA) इयर ऑन इयर बेसिसवर ७१.४५ लाखकोटींच्या तुलनेत ७७.६९ लाख कोटींवर वाढले आहे.

विशेषतः उपभोग खर्चातही (Real Consumption Expenditure) यामध्ये इयर ऑन इयर बेसिसवर ६.४% तुलनेत ७.९% वाढ झाली आहे. विशेषतः सरकारने जीएसटी दरकपात व तर्कसंगतीकरण (GST Rationalisation) केल्याचा फायदा बाजारपेठेत ग्राहकांना झाल्याचे स्पष्ट होते. उत्पादन क्षेत्रात ९.१%, बांधकाम व्यवसायात ७.२%, वित्तीय व व्यवसायिक व रिअल इस्टेट क्षेत्रात इयर ऑन इयर बेसिसवर १०.२% वाढ झाली आहे. शेती व उत्पादन क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून आली आहे कारण आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ४.१% तुलनेत यंदा ८.५% वाढ झाली आहे. उत्पादन क्षेत्रात इयर बेसिसवर गेल्या गेल्या तिमाहीतील २.२% तुलनेत यंदा ९.१% वाढ झाली आहे.

प्राथमिक क्षेत्रातील तुलनेत यंदा दुय्यम क्षेत्रात (Secondary Sector) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर सर्वाधिक वाढ झाली आहे. दुय्यम क्षेत्रात उत्पादन, इलेक्ट्रिसिटी, गॅस, पाणीपुरवठा, व इतर संबंधित सेवा सुविधांचा समावेश तर प्राथमिक क्षेत्रात शेती व संबंधित क्षेत्राचा समावेश होतो. सेवा क्षेत्रात (Teritary Sector or Service Sector) इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७.२% तुलनेत यंदा ९.२% वाढ झाली आहे. चकित करणारा निकाल लागला आहे कारण यापूर्वी विश्लेषकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात जीडीपीतील वाढ भूराजकीय कारणांमुळे व अस्थिरतेमुळे दर्शविली नव्हती. मात्र देशांतर्गत वाढलेल्या उपभोग (Consumption) वाढत्या मागणीमुळे (Demand) सह वाढलेल्या उत्पादनामुळे (Manufacturing) झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे. प्रामुख्याने सरकारने केलेल्या सकारात्मक जीएसटी निर्णयासह उत्पादन वाढवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा फायदा जीडीपीत दिसून आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >