Thursday, December 25, 2025

Gaja Marne : कुख्यात गुंड गजा मारणे याला पुणे शहरात राहण्यास बंदी; शहरातून तडीपार करण्याचे आदेश जारी

Gaja Marne : कुख्यात गुंड गजा मारणे याला पुणे शहरात राहण्यास बंदी; शहरातून तडीपार करण्याचे आदेश जारी

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारी कारवायांवर वचक ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) आता एक मोठी आणि महत्त्वपूर्ण प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात गुंड गजा मारणे याला पुणे शहर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे गजा मारणे (Gaja Marne) याला आता पुणे शहराच्या हद्दीत राहता येणार नाही.

कारवाईचे नेमके कारण काय?

गजा मारणे याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच त्याला कोथरूड येथील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो जामिनावर बाहेर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामिनावर सुटका झाल्यानंतरही गजा मारणे याने पुन्हा गुन्हेगारी कृत्य सुरू केले. त्याच्या वाढत्या कारवाया आणि शहरातील शांततेसाठी असलेला धोका लक्षात घेऊन, पोलिसांनी त्याला प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पुणे शहरात राहण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे गुंड गजा मारणे याला आता तात्काळ पुणे शहर सोडून दुसरीकडे जावे लागणार आहे. पुणे पोलिसांनी उचललेल्या या कठोर पावलामुळे शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींमध्ये जरब निर्माण झाली असून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हे मोठे पाऊल मानले जात आहे.

गजा मारणे कोण ?  

पुण्यातील गुन्हेगारीच्या जगतात ‘गजा मारणे’ हे नाव वेगळ्या धाकाने उच्चारले जाते. अमोल बधे आणि पप्पू गावडे या दोघांच्या खुनाप्रकरणी त्याला अटक झाली आणि त्यानंतर तब्बल तीन वर्षे तो येरवडा कारागृहात होता. या खटल्यांनंतर त्याची प्रतिमा ‘मारणे टोळीचा म्होरक्या’ म्हणून अधिक बळकट झाली. त्याच्यावर सहापेक्षा जास्त खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील एका व्यावसायिकाकडून तब्बल २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणीही कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. जामीनानंतर काढलेली त्याची रॅली शहरभर चर्चेचा विषय ठरली होती. पुणे पोलिसांनी एकदा त्याची ‘धिंड’ काढत त्याला गुडघ्यावर बसवले होते. उद्देश होता की त्याच्या दहशतीला चाप बसावा. पण काही काळानंतर याच गजा मारणे सोबत काही पोलिसांनी पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आणि पाच पोलिस निलंबित झाले होते.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >