भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मैत्री अधिकाधिक घट्ट होत असल्याचे पाहून पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तान हल्ले करत असताना भारताकडून मिळालेली मदत हा अफगाणिस्तानसाठी मोठा आधार आहे. पण पाकिस्तानच्या सरकारमध्ये भारत करत असलेल्या मदतीमुळे प्रचंड अस्वस्थता आहे. पाकिस्तानने केलेल्या एका हल्ल्यात अफगाणिस्तानमध्ये एक महिला आणि नऊ मुलांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तानला कडक शब्दांत इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या हल्ल्याला योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी उत्तर देऊ असे अफगाणिस्तानने जाहीर केले आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढत असतानाच भारताने अफगाणिस्तानला ७३ टन मदत विमानातून पाठवली आहे. याआधी ऑक्टोबर २०२५ मध्ये भारताने अफगाणिस्तानला औषधांचा मोठा साठा, लसचा साठा आणि वीस सुसज्ज रुग्णवाहिकांचा ताफा ही मदत पाठवली होती. भारताने अफगाणी नागरिकांसाठी सहा कल्याणकारी वैद्यकीय योजना सुरू केल्या आहेत. या योजनांसाठीही अफगाणिस्तानने मोदी सरकारचे आभार मानले आहेत.Augmenting Afghanistan’s healthcare efforts. 🇮🇳 has delivered 73 tonnes of life-saving medicines, vaccines and essential supplements to Kabul to cater to urgent medical needs. India’s unwavering support to the Afghan people continues. pic.twitter.com/G4IU1a2O3v
— Randhir Jaiswal (@MEAIndia) November 28, 2025






