सैनिकांच्या कमतरतेमुळे लष्करात अग्निवीरांची ‘घाऊक’ भरती

नवी दिल्ली : भारतीय सैन्यात अंदाजे १.८ लाख सैनिकांची कमतरता असल्याने लष्कराने अग्निवीरांची भरती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ४५ हजार ते ५० हजार सैनिकांची वार्षिक भरती एक लाखांपर्यंत वाढवली जाऊ शकते. २०२०-२१ मध्ये कोविड-१९ साथीचा आजार देशात बळावल्याने सैन्य भरती थांबवण्यात आली. या दोन वर्षांत एक लाख ते एक लाख तीस हजार सैनिक निवृत्त झाले आहेत. ज्यावेळी अग्निवीर योजना सुरू करण्यात येणार होती. त्यावेळी पुढील चार वर्षांत सैन्यात अग्निवीरांची भरती हळूहळू वाढवण्याचे नियोजन होते. याची मर्यादा १.७५ लाख होती. नौदल व हवाई दलातील भरतीची आकडेवारीही पुढील चार वर्षांत हळूहळू २८ हजार ७०० पर्यंत वाढवायची होती. अग्निवीर योजनेसह, २०२२ मध्ये कमी संख्येने लष्करात सैनिकांसह भरती सुरू झाली.


Comments
Add Comment

Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत

Krishna Temple : श्रीकृष्ण चरणी भक्ताने अर्पण केली २० लाखांची सोन्याची बासरी

राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक

Ahmedabad : अहमदाबादमधील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ जणांचा मृत्यू

Ahmedabad : अहमदाबाद मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील महमूदपुरा (Mahmudpura)

Supreme Court : 'मादर***' आणि 'सन ऑफ अ*व्होर' अश्लील नाहीत? सर्वोच्च न्यायालयाचा अजब दावा

नवी दिल्ली : शिवीगाळ आणि अश्लीलतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत मोठा निर्णय

Infiltration Bid Foiled In J&K : LoC वर पुन्हा तणाव! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदाच गोळीबार; राजौरीमधील पाकिस्तानाचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराने हाणून पाडला

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर (LoC) पुन्हा एकदा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली