मोहित सोमण:नामांकित इलेक्ट्रॉनिक्स कंपनी व्हर्लपूल इंडियाचा शेअर आज मोठ्या प्रमाणात कोसळला आहे. ११% पातळीवर सकाळच्या सत्रात शेअर्समध्ये घसरण झाली आहे. प्रामुख्याने कंपनीच्या प्रवर्तक (प्रमोटर) समुहाने आपले १.५ कोटी शेअर म्हणजेच आपले ११.८% भागभांडवल विकल्याने शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात कंपनीचा शेअर कोसळला आहे. मंगळवारी कंपनीच्या शेअर्समध्ये १००० कोटींचे ब्लॉक डील झाल्यानंतर शेअर उसळला होता. आज मात्र कंपनीच्या प्रमोटरने आपले भागभांडवल हिस्सा १४.२% सवलतीच्या दरात विकला आहे अशी माहिती मिळत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, कंपनी ९.५ दशलक्ष शेअर १०३० रूपये प्रति शेअर फ्लोअर प्राईजसह विकणार होती. अद्याप आणखी सविस्तर माहिती पुढे आली नसली तरी माहितीप्रमाणे या शेअर्सच्या विक्रीनंतर प्रमोटरकडे ५५० ते ६०० दशलक्ष डॉलर्सचा निधी येणार आहे.
कंपनीने आपल्या भागभांडवलात घसरण केली असली तरी अद्याप प्रमोटर कंपनीकडे सर्वाधिक ५१% शेअर आहेत. मुख्य कंपनीला भारतीय युनिट्मधील आपले भागभांडवल यापूर्वीच कमी करायचे होते ते आज पार पडले आहे. व्हर्लपूल मॉरिशस या पालक कंपनीला आपले ९.८% शेअर ९८० कोटीला विकायचे होते असे प्रसारमाध्यमांनी म्हटले होते. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कंपनीने आपले २४% भागभांडवल म्हणजेच जवळपास ५००० कोटींचे भागभांडवल विकले होते.
तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर २०.६% घसरण झाली होती. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ५२ कोटींच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीला ४१ कोटींचा नफा मिळाला होता. कंपनीच्या ईबीटा मार्जिनमध्येही ५% तुलनेत इयर ऑन इयर बेसिसवर ३.५% घसरण झाली होती. गेल्या महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २२.६% घसरण झाली असून महिन्याभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४०.७% घसरण झाली आहे.
सकाळी सत्राच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर ११.६३% ने घसरून १०६१.२० रुपयांवर आला. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, 'कंपनीवर भाष्य करत असलेल्या १३ विश्लेषकांपैकी आठ जणांनी 'खरेदी' रेटिंग कायम ठेवले आहे, चार जणांनी 'होल्ड' करण्याची शिफारस केली आहे आणि एकाने 'विक्री' करण्याची शिफारस केली आहे.






